24 September 2020

News Flash

SITचा सदस्य निघाला करोना पॉझिटिव्ह; चौकशीसाठी आलेल्या श्रुती मोदीला पाठवलं परत

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग अँगलची चौकशी

मुंबई : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तिची माजी बिझनेस मॅनेजर श्रृती मोदी हिला एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं होतं.

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील ड्रग अँगलप्रकरणी नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) विशेष तपास पथकानं (एसआयटी) सुशांतची माजी बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी हिला बुधवारी चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं. दरम्यान, एसआयटीचा एक सदस्य करोना पॉझिटिव्ह आढळल्यानं ही चौकशी स्थगित करुन श्रुतीला परत घरी पाठवण्यात आलं.

एनसीबीनं श्रुती मोदीला चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी मंगळवारी समन्स बजावलं होतं. त्यानुसार, श्रुतीनं आज (बुधवार) एनसीबीच्या कार्यालयात हजेरी लावली. मात्र, त्याचवेळी चौकशी पथकातील एक सदस्याचा अँटीजेन चाचणी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये तो करोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पण्ण झाले. त्यामुळे नियमानुसार या पथकातील इतर सदस्यांची देखील करोना चाचणी करावी लागणार असल्याने श्रुती मोदीला पुन्हा पाठवून देण्यात आले, अशी माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांन दिली.

सीबीआयनं दाखलं केला एफआयआर

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआयने सहा जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या सहा जणांपैकी एक श्रुती मोदी आहे. सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात अभिनेत्री रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतच्या घराचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी ही सहा नावं आहेत. सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करताना रियासोबतच श्रुतीचंही नाव घेतलं होतं. त्यांच्या तक्रारीच्या आधारेच बिहार पोलिसांनी एफआयआर दाखल केली होती.

कोण आहे श्रुती मोदी?

रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची मॅनेजर म्हणून श्रुती मोदीने काम केलं आहे. सुशांतच्या कंपनीत रिया-शोविकचं सर्व काम श्रुती पाहायची. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी श्रुतीचीही चौकशी केली होती. श्रुतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तीनं जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० या काळात सुशांतसोबत काम केलं होतं. दरम्यान, श्रुतीने मुंबई पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सुशांत आर्थिकदृष्ट्या सक्षम होता आणि दर महिन्याला जवळपास दहा लाख रुपये खर्च करायचा. यामध्ये वांद्रे इथल्या घराचं साडेचार लाख रुपये भाडं तो भरायचा. सुशांतच्या दर महिन्याच्या खर्चाचा हिशोबसुद्धा तिने पोलिसांना सोपवल्याचं कळतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:04 pm

Web Title: one of the members of sit has tested positive for covid 19 then ncb has sent back shruti modi who had joined investigation today aau 85
Next Stories
1 “महाराष्ट्र याला सहमत नाही,” सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान केलं स्पष्ट
2 ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची करोनावर मात
3 त्यावेळी चित्रपटसृष्टीत मराठी लोकांना घाटी संबोधलं जायचं : उर्मिला मातोंडकर
Just Now!
X