News Flash

बोरीवली-साखरपा एसटी अपघातात एक ठार

चिपळूण वालोपे येथे बोरीवली साखरपा एसटीला बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता भीषण अपघात होऊन लक्ष्मण धोंडू नारकर (वय ४३, रा. बाईत चाळ अंधेरी, मुंबई) हे मृत्युमुखी

| August 28, 2014 04:30 am

चिपळूण वालोपे येथे बोरीवली साखरपा एसटीला बुधवारी पहाटे पावणेपाच वाजता भीषण अपघात होऊन लक्ष्मण धोंडू नारकर (वय ४३, रा. बाईत चाळ अंधेरी, मुंबई) हे मृत्युमुखी पडले तर १५ प्रवासी जखमी झाले.
जखमींमध्ये सुजाता रामचंद्र परशुराम (वय २३, रा. संगमेश्वर), सर्वेश संभाजी मोवळे (१३), सुंदरा प्रकाश मोरे (५०, रा. अंधेरी), अपर्णा अनंत नाखरेकर (२६, रा. बोरीवली),  प्रकाश शांताराम सावंत (४५, रा. मालाड), स्वप्नाली संतोष तावडे (३२, रा. शिपोशी), सुनंदा शिवराम अडवळ (६४, रा. विलेपार्ले),दिपक रावजी अडवल (४५, रा. गोरेगांव), संतोष दत्ताराम तावडे (४५, रा. सांताक्रूझ),  स्मिता संभाजी मोवळे (३७, रा. गोरेगाव) यांचा समावेश आहे. त्यांच्यावर कामथे येथे  रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावर चौपदरी रस्त्यावर इन्सुली खामदेव येथे पहाटे एक वाजता झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. कुडाळ येथून बांदा येथे जाणारी स्विप्ट कार कोसळून हा अपघात झाला. जमीर दाऊद मुल्ला (३०) आणि नेल्सन बस्त्यावर फर्नाडिस (२५) ही ठार झालेल्यांची नावे आहेत. ते बांदा आणि सातार्ड येथील रहिवासी होते. तर सॉल्विन पेद्रु रॉड्रिक्स हा हे जखमी प्रवाशाचे नाव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2014 4:30 am

Web Title: one passenger dies 15 hospitalised after bus mishap
Next Stories
1 जन-धन योजनेंतर्गत १५ हजार खाती सुरू
2 राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांच्या बनावट पत्राने गदारोळ
3 डॉ. किरण जाधव आत्महत्याप्रकरणी कोल्हाटी समाजाचा सोलापुरात मोर्चा
Just Now!
X