नाशिकमध्ये स्वाइन फ्लू या आजाराने एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्वाइन फ्लू कक्षात त्याच्यावर उपचार सुरु होते. मागील ११ दिवसात ३२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यात आता आणखी एका रुग्णाची भर पडली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लूचं थैमान माजलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक स्वाइन फ्लूचे बळी हे नाशिक जिल्ह्यात गेले आहे. वातावरणात जे बदल होत आहेत त्यामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऑक्टोबर हिटचा तडाखा बसू लागला आहे तरीही या स्वाइन फ्लूचा कहर कमी झालेला नाही. स्वाइन फ्लूचं थैमान नाशिक जिल्ह्यात सर्वत्र आहे. प्रशासनाने काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. टॅमी फ्लूच्या गोळ्या आणि इतर औषधांचे वाटपही सुरु आहे. नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन महापालिकेनेही केले आहे.