28 October 2020

News Flash

पालघर शहरात टँकरखाली चिरडून एकाचा मृत्यू

टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात

(संग्रहित छायाचित्र)

लोकसत्ता,वार्ताहर

पालघर शहरातील शिवाजी चौक येथे असलेल्या पुलावर झालेल्या दुचाकी व टँकर अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला.टँकरखाली आल्याने दुचाकी चालक चिरडून ठार झाला तर दुचाकीच्या मागे बसलेला तरुण या अपघातात बचावला.

टँकर पालघरहून मनोरच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकी व टँकरमध्ये अपघात झाल्याने ३९ वर्षीय संतोष सुकुर दुबळे दुचाकीस्वार टँकरच्या मागील चाकाखाली गेला.डोक्यावरून चाक गेल्याने डोक्याला गंभीर इजा होऊन तो जागीच मरण पावला.दुबळे हा पालघर तालुक्यातील शिरगाव चुनभट्टी परिसरातील चांडाळी पाडा येथील रहिवासी आहे.

ही घटना घडली त्या ठिकाणी बाजूलाच पोलीस चौकी असल्याने पोलिसांनी धाव घेत या इसमाला ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. टँकरसह टँकरचालक पोलिसांनी ताब्यात घेतला असून पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पालघर पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 10:40 pm

Web Title: one person dead in palghar in the accident of tanker scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात १८ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण, ३९२ मृत्यू
2 मराठा आरक्षण आंदोलन : गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय
3 १२२ करोना रुग्णांची ३३ लाखांपेक्षा जास्त रक्कम सातारा जिल्हा प्रशानामुळे मिळाली परत
Just Now!
X