News Flash

३ महिन्यानंतरही कांद्याला मिळेना भाव, आता शेतकऱ्यांसह व्यापारीही अडचणीत

कांद्याला ग्राहक मिळत नसल्याने व्यापाऱ्यांकडे कांदा पडून राहत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप पिकांसह कांदा पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. मागील तीन महिन्यांपासून कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापारीही अडणीत सापडले आहेत. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांद्याला ग्राहक मिळत नसल्याने व्यापाऱ्यांकडे कांदा पडून राहत असल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

सध्यास्थितीत जाधववाडी बाजार समितीत कांद्याला ३०० ते ७०० रुपये भाव मिळत असून किरकोळ बाजारात १० रुपये प्रति किलोने विक्री होत आहे. समितीत लासलगाव,घोडेगावसह जिल्ह्यातील विविध भागातून कांदा विक्रीसाठी दाखल होत असून कांद्यांची गुणवत्ता चांगली नसल्याने भाव मिळत नाही. दुसरीकडे साठवून ठेवता येत नसल्याने मिळेल त्या भावात व्यापारी विक्री करत आहेत. समितीत नोव्हेंबरपासून कांद्याची आवक वाढल्याने होलसेल बाजारात कांद्याला ३०० ते ७०० रुपये प्रतिक्िंवटली भाव मिळत

आहे. चांगल्या गुणवत्तेचा कांदा ८०० रुपये प्रति क्िंवटली विकला जात आहे. यंदा दुष्काळ पडल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे शेतकरी आपला माल व्यापाऱ्यांना विकण्या ऐवजी स्वत:विक्री करत आहेत. ऑक्टोबर २०१८ मध्ये होलसेल बाजारात कांदा १८०० ते २२०० रुपये प्रतिक्विं टली विकला जात होता. त्यात दुष्काळाचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांनी बाजारात कांद्याचे दर किलो मागे ५ ते ७ रुपयांनी वाढवले होत.े त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात कांद्याची आवक वाढल्याने भाव कोसळले होते. नोव्हेबर महिन्यात कांदा ६०० ते ९०० तर डिसेंबर महिन्यात २०० ते ५०० तर जानेवारी महिन्यात ३०० ते ७०० रुपये प्रति क्विंटली विक्री झाला. ही परिस्थती अद्यापही कायम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2019 8:52 pm

Web Title: onian price low news
Next Stories
1 उकळत्या गुळाच्या काहिलीत उडी मारुन कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न 
2 बारामतीत या, तुम्हाला दाखवतोच! अजित पवारांचा महाजनांना इशारा
3 मनुष्यबळ विकास मंत्रालयात नोकरीच्या आमिषाने माजी सैनिकांना ३० लाखांना गंडा
Just Now!
X