05 June 2020

News Flash

कांदा घसरल्याने शेतकरी रस्त्यावर

लाल कांद्याची आवक सुरू झाल्यापासून भावात घसरण सुरू आहे.

विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर आंदोलन करताना कांदा उत्पादक.

कांदा भावात शनिवारच्या तुलनेत प्रति क्विंटलला सरासरी ५१० रुपयांची घसरण झाल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव येथील विंचूर-प्रकाशा राज्य मार्गावर दीड तास रास्ता रोको करत संतप्त भावना व्यक्त केल्या. कांद्याचे किमान निर्यात मूल्य कमी करावे तसेच कांदा भावात वाढ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. शनिवारी कांद्याला सरासरी प्रति क्विंटल १६१० रुपये भाव मिळाला होता. सोमवारी हाच भाव ११०० रुपयांपर्यंत खाली आला.
लाल कांद्याची आवक सुरू झाल्यापासून भावात घसरण सुरू आहे. सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ हजार ६०४ क्विंटल आवक झाली. त्यास किमान ८०० ते कमाल १५३५ रुपये भाव मिळाला. कांद्याचे निर्यात मूल्य कमी होत नसल्याने निर्यातदार लिलावात सहभागी झाले नव्हते. त्याची परिणती भाव घसरण्यात झाल्याचे लक्षात आल्यावर शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले आणि आंदोलन सुरू केले. विंचूर-प्रकाशा रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांनी ठाण मांडून वाहतूक बंद पाडली. लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली. बाजार समिती कांदा भावात घसरण होऊ नये म्हणून शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले. टँकरने पाणी आणून कांदा उत्पादन घेतल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. बाजार समितीचे माजी सभापती जयदत्त होळकर यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडत कांदा भावाची घसरण न रोखल्यास शेतकरी संतप्त होतील, असा इशारा दिला. प्रति क्विंटलला किमान १५०० रुपये हमी भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2015 6:08 am

Web Title: onion farmers on the road due to rate down
टॅग Onion
Next Stories
1 ‘अणेंमुळेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा’
2 अधिवेशनातून – विदर्भातील संत्र्याचे मुख्यमंत्री ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर
3 अणे यांच्या हकालपट्टीसाठी सेनेची निदर्शने
Just Now!
X