सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी कांद्याची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली असताना प्रत्यक्षात जेमतेम २५ मालमोटारी भरून कांदा आला. त्यामुळे कांद्याचा दर गगनाला भिडत प्रतिक्विंटल तब्बल ७४०० रुपयांपर्यंत गेला.
सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी-विक्री प्रचंड प्रमाणात होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आदी भागांतून कांद्याची आवक होते. येथे कांद्याला चांगला दर मिळतो. परंतु शुक्रवारी बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच कांदा दर कडाडून तो विक्रमी स्वरूपात म्हणजे किमान सहा हजार ते कमाल सात हजार ४०० रुपये प्रतिक्वंटल गेला.