मुंबई आणि पुण्यात कांद्याचा भाव प्रति किलो १०० रुपये इतका झाला आहे. २१ ऑक्टोबरला पुण्यात कांद्याचा दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलो तर मुंबईत कांद्याचा दर ८० ते १०० रुपये प्रतिकिलो इतका होता. कांद्याची मागणी बाजारात वाढली आहे आणि पुरवठा कमी झाला आहे त्यामुळे कांद्याचे दर कडाडले आहेत. पुणे एपीएमसीत कमिशन एजंट म्हणून काम करणाऱ्या विलास भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास ६० टक्के कांद्याचं उत्पादन हे नाशिकजवळच्या लासलगावमध्ये होतं. सध्या बाजारात कांद्याला जेवढी मागणी आहे त्या प्रमाणात पुरवठा होत नाहीये. पुरवठ्यात कमतरता होत असल्याने कांद्याचे दर कडाडले आहेत.

फक्त किरकोळ बाजारातच नाही तर घाऊक बाजारातही कांद्याचे दर कडाडले आहे. क्विंटलचा दर जानेवारीत १९०० रुपये होता जो आता ६ हजारांच्या पुढे गेला आहे असंही कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं. अतिवृष्टीमुळे कांद्याची बाजारांमधली आवक घटली आहे. असं असलं तरीही कांद्याची मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत.

सध्या कांद्याची मागणी घाऊक आणि किरकोळ बाजारामध्ये चांगलीच वाढली आहे. अशात पुरवठा मात्र कमी झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव चांगलेच कडाडले आहेत. बुधवारी मुंबईत कांदा ८० ते १०० रुपये प्रति किलो तर पुण्यात १०० ते १२० रुपये किलोच्या दराने विकला गेला…मागच्या आठवड्यात कांद्याचे दर ७० ते ८० रुपये किलो होते. या आठवड्यात मात्र कांद्याचे दर चांगलेच कडाडल्याचं दिसून येतं आहे.