नोटाबंदीपूर्वी कांद्याच्या पिकातून मिळणाऱ्या उत्पन्नावर आता काही विश्वास राहिला नाही.. सतराशे क्विंटलचा भाव सातशे रुपयांपर्यंत उतरला आहे. भाव बेभरवशाचा झाला आहे. जुगाराचे असते तसेच झाले.. जुगार तरी परवडेल. पण कांद्याची शेती काही परवडणारी राहिली नाही. हमीभावच नाही.  त्यामुळे आता सोयाबीनकडे वळलो आहोत.. माझीच नाहीतर गावच्या अनेकांची ही मनोवस्था आहे. कांद्याचे कोठार म्हणून असलेली ओळख पुसते की काय, अशी स्थिती झाली आहे.

तुळजापूर तालुक्यातील आपसिंगा गावचे कांदा उत्पादक चंद्रकांत डांगे सांगत होते. त्यांच्यासोबतचे राहुल गोरे व चंद्रकांत तोडकरी यांचेही तेच म्हणणे. आपसिंगा गाव हे लहान असले तरी अनेक वर्षांपासून कांद्याचे कोठार म्हणूनच ओळखले जाते. सतराशे रुपये िक्व टल असलेला कांदा आता चक्क सातशे रुपये प्रतििक्वटलवर येऊन घसरल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आपसिंगासोबत पाथरी या गावातून सुमारे पंधरा हजार टन कांदा कर्नाटकमधील बंगळुरू आणि आंध्र प्रदेशातील हैदराबादच्या बाजारात विक्रीसाठी जातो. सध्या शिवारात भरमसाट कांदा आणि बाजारातील भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळय़ंत पाणी आले आहे.  नळदुर्ग येथील तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याने एका वर्षी गावातील शेतकऱ्यांच्या उसाचा हप्ताच अदा केला नाही. आíथक संकटाच्या खाईत कोसळलेल्या आपसिंगावासीयांनी तेव्हापासून उसाला कायमचा रामराम करीत कांदा आणि द्राक्ष प्रभावी पर्याय म्हणून स्वीकारला. त्यातून अनेकांच्या वाटय़ाला आíथक सुबत्तादेखील आली. मागील चार वष्रे सलग दुष्काळ असल्यामुळे कांदा आणि द्राक्ष उत्पादकांची चांगलीच कसरत झाली. यंदा समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे लाल कांद्याची लागवडही मोठय़ा प्रमाणात झाली. ८ नोव्हेंबरपूर्वी बाजारात चांगल्या प्रतीच्या कांद्याला सतराशे रुपये तर सरासरी तेराशे ते पंधराशे रुपये प्रतििक्वटल दर मिळत होता. नोटाबंदीमुळे बाजारातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातच नवीन कांदा मोठय़ा प्रमाणात दाखल झाल्याने भाव चक्क कोसळले आहेत. महिनाभरानंतर तब्बल आठशे रुपयांचा तोटा शंभर किलो कांद्यामागे शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.

कांदाशेती परवडणारा जुगार

सलग चार वष्रे दुष्काळ होता. त्यामुळे हातात पसे नसल्याने कमी क्षेत्रात कांदा घेतला. मात्र, या वर्षी भाव पडल्याने यंदा कांद्याची शेती नुकसानकारक ठरल्याचे चंद्रकांत डांगे यांनी सांगितले. तर राहुल गोरे व चंद्रकांत तोडकरी यांनी चार ते पाच एकरामध्ये कांद्याची लागवड केली. कांद्याच्या दराबाबत भरवसा नसल्याने सोबत सोयाबीनची लागवड केली होती. त्यामुळे वरचेवर आपसिंगा परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. कांद्याला हमीभाव दिला जात नसल्याने कांदा शेतीचा जुगार परवडणारा राहिला नाही, अशी खंत व्यक्त केली.