करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरीच राहून कार्य करण्याकरता महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विद्यापीठाने दिशानिर्देश जारी केले आहेत.  सोशल डिस्टंसिंगचे पालन व्हावे यासाठी शैक्षणिक व गैर-शैक्षणिक कर्मचा-यांना सोशल मीडियाचा वापर करुन घरीच काम करण्याचा सल्ला दिला आहे.

विद्यापीठाने प्राध्यापकांना ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी व्‍हाॅट्स अ‍ॅप व एसएमएस ग्रुप तयार करुन  विद्यार्थ्यांना नोट्स,  अभ्यासक्रम सामग्री,  संबंधित अध्‍ययन सामग्री देण्याचे आवाहन केले आहे. प्राध्यापक आधीच मुक्‍स (MOOCs) च्या माध्‍यमातून ऑनलाइन वर्ग संचालित करत आहेत. परंतु आता ते यूट्युब, व्‍हाट्स अ‍ॅप,  इंस्‍टाग्राम,  झूम,  स्‍काइप,  गुगल क्‍लासरुम, सिस्‍को वेबकास्‍ट तथा गुगल हॅंग आउट्स सारखे सोशल मीडिया प्‍लॅटफार्म वापरत आहेत.

कुलगुरु रजनीश कुमार शुक्‍ल यांनी सर्व प्राध्यापकांना दैनंदिन स्तरावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासरूममध्ये व्‍यस्‍त ठेवून शिक्षण देण्याचा आग्रह केला असुन करोनामुळे उदभवलेल्या संकटाच्या काळात आपले कौशल्य डिजिटल प्‍लेटफार्मवर अधिक समृद्ध करण्याची उत्तम संधी असल्याचे म्हटले आहे. कुलगुरु शुक्‍ल यांनी गुगलच्या शैक्षणिक सेवांच्या माध्यमातून विद्यापीठाचे प्रयागराज केंद्र तसेच वर्धा मुख्‍यालयातील मानव विज्ञान विभाग, उर्दू, इंग्रजी तथा नाट्यकला विभागातील सर्व प्राध्यपकांबरोबर व्हिडियो कॉन्‍फरन्सिंगद्वारे संवाद साधला व ऑनलाइन क्लासरूमच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यांनी हिंदी व तुलनात्‍मक साहित्‍य विभाग, दूर शिक्षा निदेशालय, जनसंचार विभागातील प्राध्यपकांच्या ऑनलाइन बैठका घेवून अभ्यासक्रमाशी संबंधित व्‍याख्‍याने यू टयूबवर अपलोड करण्यास सांगीतले. या निर्देशानुसार प्राध्यापकांनी व्‍याख्‍यानांचे रेकार्डिंग करुन ते यू टयूबवर अपलोड केले आहेत. विद्यापीठातील गैर शैक्षणिक कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने  कार्यालय व्‍यवस्‍थापन,  डाटा प्रोसेसिंग,  नवे सॉफ्टवेअर,  नवनवीन संसाधने तसेच तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा असे सांगण्यात आले आहे. कर्मचारी यांच्याशी दैनंदिन संपर्क करण्यासाठी कुलगुरू स्‍वत: ऑनलाइन बैठका घेत आहेत.

करोना व्हायरसला आळा घालण्यासाठी तसेच सोशल डिस्टंसिंगचे पालन होण्यासाठी घरुनच काम करण्याच्या या उपक्रमाचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी स्‍वागत केले आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री डॉ. रमेश पोखरीयाल ‘निशंक’ यांनी  सर्व विद्यापीठांना लॉकडाउन दरम्यान विद्यापीठ बंद ठेवावी व विद्यार्थ्यांना इ-लर्निंगच्या माध्‍यमातून शिक्षण देणे सुरू ठेवण्याचे आहवान केले आहे, यासाठी http://www.swayam.gov.in ही वेबसाइट बघावी अशी सूचनाही त्यांनी केली आहे.