News Flash

वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर बाह्य जिल्ह्यातील रुग्ण तपासणीसाठी ‘ओपीडी’

पुलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार यांच्या संकल्पनेतून रुग्णालय सुरू

पुलगाव शहरातील रुग्णालयात उपचारासाठी अमरावती, यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या सीमेवर पुलगाव येथे ओपीडी उभारली आहे.

वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर लिंबाच्या झाडाखाली उभारण्यात आलेल्या रुग्णालयात जिल्ह्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत चालणाऱ्या या ओपीडीमध्ये तपासणी आणि औषधोपचार केले जात आहेत.

पुलगाव येथील आरोग्य विभागाने हे रुग्णालय चेक पोस्टवर उभारले आहे. पुलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गोपाळ नारलवार यांच्या संकल्पनेतून हे रुग्णालय येथे उभारण्यात आले आहे. पुलगाव येथे यवतमाळ, अमरावती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. याशिवाय मुंबई, पुणे, औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिक देखील वर्ध्यात दाखल होत आहेत. त्यामुळे चेक पोस्टवर जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या वाहनांना थांबवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

दिवसात दोन शिफ्टमध्ये चालणारी ही ओपीडी करोना नियंत्रणासाठी फायदेशीर ठरते आहे. अनेकजण उपचारासाठी पुलगाव शहरातील रुग्णालयात येत आहे. उपचारासाठी अनेकजण येत असल्याने रुग्णालयात गर्दी होत आहे. यासाठी चेक पोस्टवर रुग्णालय उभारले आहे. त्यासोबत जे नागरिक करोना जिल्ह्यातून पुलगाव परिसरात वाहनांनी येत आहेत. त्यांची वाहने जिल्ह्याच्या सीमेवर थांबवली जात आहेत आणि त्यांना त्या वाहनांना परत पाठवले जात आहे.

एवढंच नव्हे तर या चेकपोस्टवरील रुग्णालयात मुंबई , पुणेसह करोनाबाधीत जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना आणि चालकाला सीमेवर थांबवण्यात येत आहे. या नागरिकांच्या नातेवाईकांना संपर्क साधत त्यांना वर्धा जिल्ह्याच्या वाहनाने घरी नेण्याचे सांगण्यात येत आहे आणि करोनाबाधित जिल्ह्यातील वाहनाला परत पाठवले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 9:51 pm

Web Title: opd for examination of patients in outer districts on the border of wardha district msr 87
Next Stories
1 मुंबईवरून बुलडाणा जिल्ह्यात आलेली मुलगी करोनाबाधित
2 रायगड जिल्ह्याला टंचाईच्या झळा, १२ तालुक्यांमध्ये ३१ टँकरद्वारे पाणी पुरवठा
3 लॉकडउनमुळे पालघर जिल्ह्यात अडकलेल्या 34 हजार 816 नागरिकांनी मिळाले ई-पास
Just Now!
X