रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि निलक्रांती सहकारी संस्थेचा संयुक्त उपक्रम असलेल्या,समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र कांदळगाव, मालवण येथे जिल्हाधिकारी श्रीमती.के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.

यावेळी तहसीलदार श्री.पाटणे, प्रांताधिकारी श्रीमती. खरमाळे,मालवण,मालवण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी पाटील, मालवण नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री.जावडेकर,मालवण नगराध्यक्ष महेश कांदळगावकर,नगरसेवक नितीन वाळके,कांदळगाव सरपंच उमेदी परब व ईतर ग्रामपंचायत सदस्य,डॉ.म्ोालविका झांटय़े तसेच आरोग्य क्षेत्रातील  क्षेत्रातील मान्यवर व  निलक्रांती सहकारी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी रेडकर हॉस्पिटल रिसर्च  सेंटर आणि निलक्रांती सहकारी संस्थेचा संयुक्त उपक्रम असलेल्या समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्राला शुभेच्छा दिल्या आणि रेडकर हॉस्पिटलने घेतलेल्या पुढाकारबद्दल शासन तर्फे आभार मानले.रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे अध्यक्ष यांनी ग्रामीण भागातील अश्या प्रकारचे हे कोकणमधील हे पहिलेच केंद्र असल्याचे सांगितले तसेच असे केंद्र प्रत्येक तालुक्यात उभे राहिले पाहिजे. असे आवाहन केले. डिसीएससीमधील उपलब्ध अत्याधुनिक उपकरणे,टेली मेडिसिन तसेच ईतर सोयी सुविधा याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी काही राखीव जागा ठेवण्याचे आश्वासन दिले.

सदर उपक्रमाचे वैशिष्ट म्हणजे करोनाबाधित होऊन करोना मुक्त झालेल्या वैद्यकिय क्षेत्रातील व्यक्तींनी सुरू केलेले हे पहिलेच केंद्र आहे. सदर केंद्र तर्फे सेवा सुविधा सुरू केल्या असून (०२३६५/२५२११५)या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन रविकिरण तोरसकर यांनी केले आहे.

सदर उपक्रमामुळे जिल्हा प्रशासनवरील ताण कमी होणार असून,जिल्हावासियांना अत्याधुनिक सेवा तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध होणार आहे, असे डॉ विवेक रेडकर यांनी सांगितले.

अकलूज येथील तज्ञ डॉ. श्री. ईनामदार टेली मेडीसिनद्वारे तर मालवण येथील हृदयरोगतजज्ञ डॉ.मालविका झाटय़े ,डॉ.रामचंद्र चव्हाण,अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.क्षिरसागर,रेडकर हॉस्पिटल चे वैद्यकिय अधिकारी डॉ.दर्शन खानोलकर,आहार तज्ञ डॉ.गार्गी ओरस्कर,डॉ.शुभांगी जोशी तसेच ईतर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.