23 January 2021

News Flash

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करोनामुक्त, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

रुग्णालयाबाहेर येताच हात जोडून अभिवादन

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करोनामुक्त झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते जसं आधी म्हणाले होते त्याप्रमाणे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते. आज याच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी आणि माजी मंत्री गिरीश महाजनही होते.

सेंट जॉर्ज रुग्णालयाचे सुप्रीटेंडंट डॉ. आकाश खोब्रागडे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुढचे १० दिवस होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले. त्यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. गेल्या रविवारी आणि सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते असंही डॉ. खोब्रागडे यांनी सांगितलं.

करोनाचा संसर्ग झाल्यास आपण सरकारी रुग्णालयात उपचार घेऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते. डॉ. तात्याराव लहाने आणि इतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला असून दहा दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 5:44 pm

Web Title: opposition leader devendra fadnavis defeat corona and discharged from hospital scj 81
Next Stories
1 “पेंग्विनसारखा दिसतो तर पेंग्विनच म्हणणार आणि पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना”
2 नाईक परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे -भाजपा
3 Unlock : राज्यातील चित्रपटगृहं, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहं सुरु होणार
Just Now!
X