लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : करोनाच्या गंभीर परिस्थितीत संत गाडगे बाबा अमरावती विद्याापीठांतर्गत येणारी वरिष्ठ महाविद्याालयं १ ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात यावे असा आदेश उच्च शिक्षण सहसंचालकांनी जारी केला आहे. या संबंधी सहसंचालकांनी सर्व प्रचार्यांची सभा २३ जुलैला ऑनलाइन आयोजित केली. या आदेशाला महाराष्ट्र शिक्षक आघाडीने विरोध दर्शविला आहे.

देशात करोनाची सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात असून नुकताच इंडियन मेडिकल असोसिएशनने देशात समूह संसर्गाला सुरुवात झाली आहे, असा अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे. पायाभूत सुविधांची वानवा असलेल्या महाविद्याालयात सामाजिक अंतराचे पालन करणे अशक्य असून सॅनिटायझर, हँडवॉश, आसन क्षमतेत बदल आदी नियमाचे काटेकोर पालन करणे अत्यंत कठिण आहे. अशा परिस्थितीत समूह संसर्ग झाल्यास जबाबदारी कुणाची? असा संतप्त सवाल महाराष्ट्र शिक्षक आघाडीने संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य फोरमचे सचिव डॉ.नीलेश गावंडे यांनी उपस्थित केला. १ ऑगस्टपासून महाविद्याालय सुरू करणे म्हणजे शिक्षक व विद्यााथ्र्यांच्या जीविताशी चाललेला खेळ असल्याचे म्हटले आहे.

गेल्या चार महिन्यात विविध कार्यालयाच्या कर्मचारी उपस्थिती संदर्भातील शासन निर्णय १० ते ५० टक्के असतांना १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या महाविद्याालयांमध्ये १०० टक्के उपस्थितीचा आदेश देणे हे न समजण्यासारखे असून ही बाब अत्यंत गंभीर व धोकादायक आहे. त्यामुळे शाळा महाविद्याालय १ ऑगस्टपासून सुरू न करता शैक्षणिक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी पूर्ण अभ्यासक्रम कायम ठेवून जानेवारी ते डिसेंबर अशी नवीन सत्र पद्धती अस्तित्वात आणून १ जानेवारीपासून महाविद्याालय सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.

ऑनलाइन अध्यापनामुळे शिक्षणाचा बोजवारा
ऑनलाइन अध्ययन व अध्यापनाही महाराष्ट्र शिक्षक आघाडीने विरोध दर्शविला असून ऑनलाइन अध्यापनामुळे आधीच शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. पायाभूत सुविधांची कमतरता असलेल्या ग्रामीण भागात ऑनलाइन अध्यापन शक्य नसल्याचेही म्हटले आहे.