जायकवाडीला पाणी देण्याबाबत शेतकरी व राजकीय पक्षांचा विरोध मोडून काढीत प्रशासनाने कडेकोट बंदोबस्तात बुधवारी सकाळी ९ वाजता मुळा धरणाच्या सात दरवाजांतून मुळा नदीपात्रात पाणी सोडले. सहा दिवसांत ३ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे.
जायकवाडी धरणात पाणी सोडू नये म्हणून मंगळवारी सर्वपक्षीय रास्ता रोको अंदोलन झाले. धरणातून पाणी सोडण्यात आल्याने शेतकरी संतप्त आहेत, त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.