News Flash

Coronavirus: राज्यातील ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश

राज्यातील ६० तुरूंगांतील कैद्यांचा समावेश

(संग्रहित छायाचित्र)

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग हाच सध्या एकमेव पर्याय असल्याने राज्याच्या गृहखात्याने या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोलवर सोडण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

देशमुख यांनी म्हटले की, ” सात वर्षे किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळपास ११,००० कैद्यांना तातडीने पॅरोल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील आठवड्याभरात यावर कारवाई व्हावी, अशाही सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2020 9:17 pm

Web Title: order to immediately release of 11000 prisoners in state on parole backdrop of corona virus aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 “भीम जयंती करोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच साजरी करू”
2 Coronavirus: राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आमदार, खासदारांचे एक महिन्याचे वेतन सहाय्यता निधीसाठी देणार
3 ठाकरे सरकारचा इशारा : डाॅक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना घर सोडण्यास सांगितल्यास हाऊसिंग सोसायटीवर कारवाई
Just Now!
X