होमिओपॅथी व्यावसायिकांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने यापूर्वीच निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अध्यादेश काढण्याचे सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत ठरले. अ‍ॅलोपॅथी व्यवसाय करण्यापूर्वी होमिओपॅथी व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधशास्त्राचा एक वर्षाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उत्तीर्ण करण्याची अट आहे. यादृष्टीने मुंबई समचिकित्सा व्यवसायी अधिनियम १९५९ आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ मध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे. मात्र,सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरु नसल्याने याबाबत अध्यादेश काढण्याचा निर्णय झाला.