News Flash

‘राजारामबापू’च्या प्रयोगशाळेकडून ‘राजाराम द्रावण’ची निर्मिती

राजारामबापू साखर कारखान्याच्या जैविक प्रयोगशाळेतून ‘राजाराम - एम दुय्यम द्रावण’ नावाच्या जैविक औषधाचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे.

राजारामबापू साखर कारखाना कार्यस्थळावर ‘राजाराम-एम दुय्यम द्रावण’चे लाँचिंग करताना प्रतीकदादा पाटील. कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील व अन्य.

उसासह अन्य पिकांसाठी उपयुक्त

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याच्या जैविक प्रयोगशाळेतून ‘राजाराम – एम दुय्यम द्रावण’ नावाच्या जैविक औषधाचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. उसासह सर्व पिकांना उपयुक्त असलेल्या या द्रावणामुळे पिकाची चांगली वाढ होण्याबरोबरच जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होणार आहे. या औषधाचे वितरण युवा नेते प्रतीकदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या नवीन औषधाबाबत प्रतीकदादा पाटील म्हणाले,की राजारामबापू कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. कारखान्याच्या प्रयोग शाळेतून उत्पादित होणाऱ्या ‘राजाराम एम दुय्यम द्रावण’ या औषधाचा शेतकऱ्यांना निश्चितपणे लाभ होईल. आजच्या भेसळीच्या युगात हे द्रावण परिणामकारक ठरेल.

ऊसविकास अधिकारी सुजय पाटील म्हणाले,की या द्रावणाचा वापर ऊस व इतर पिकास होऊ शकतो. या द्रावणाने पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होते. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ वेगाने कुजून सेंद्रिय कर्ब वाढते. जमिनीतील पोषण द्रव्याची वाढ होऊन जमिनीचा पोत सुधारतो.

या प्रसंगी राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील,शेती समितीचे अध्यक्ष श्रेणीक कबाडे, मुख्य शेती अधिकारी प्रशांत पाटील,  शेती प्रयोगशाळा प्रभारी स्न्ोहल मोहिते, प्राजक्ता पाटील आदी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 2:17 am

Web Title: organic laboratory rajarambapu sugar factory biological ssh 93
Next Stories
1 नवी मुंबई विमानतळ नामकरण  आंदोलनाला भाजपची रसद?
2 सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये करोना संसर्गदर चिंताजनक
3 चंद्रपूरच्या दारुबंदी संदर्भात उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल
Just Now!
X