तब्बल पाच ते सहा किलो वजनाचे सेंद्रीय पध्दतीच्या रताळ्याचे उत्पादन भाटकी (ता.माण) येथील वसंत शिर्के यानी शेतात घेतले आहे. रताळ हे कंदमुळ पिकाचा प्रकार असुन जेवणातील उपवासात याचा वापर केला जातो. तब्बल पाच ते सहा किलो वजनाचे सेंद्रीय पध्दतीने पिक घेतले आहे. दहा गुंटे क्षेत्रात सुमारे साठ हजार रुपयांचे ऊत्पन्न मिळेल असा विश्वास शिर्के या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

म्हसवड (ता माण) पासुन सुमारे पाच किलोमिटर अंतरावर भाटकी हे सुमारे बाराशे लोकवस्तीचे गाव आहे. सध्या नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. रताळास मोठी मागणी आहे. शिर्के यांच्या शेतात पाच ते सहा किलो वजनाचे रताळे आले आहेत.

ambadichi bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
गावाकडील पारंपरिक पोटली पद्धतीची चविष्ट अंबाडीची भाजी; ही घ्या सोपी मराठी रेसिपी
69 villages in Vasai will get water from Surya project
वसईतील ६९ गावांचा पाणी प्रश्न मिटला; लवकर सुर्या प्रकल्पातील पाणी मिळणार
loksatta analysis ai based system to reduce human wildlife conflict in tadoba andhari tiger reserve
विश्लेषण : ताडोबातील वन्यजीवमानव संघर्षात ‘एआय’ नेमके काय करणार?
Unseasonal rain Washim
वाशिममध्ये अवकाळी पाऊस, गारपीट; हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा हवालदिल

या भागात वेळोवेळी झालेल्या पावसामुळे या पिकास पोषक वातावरण असल्यामुळे भरघोस पिक उत्पादन हाती लागले असल्याचे शिर्के यांनी सांगितले.