24 November 2020

News Flash

पंढरपूरमध्ये कार्तिकी वारीतही निर्बंध

भाविकांनी पंढरपुरात येऊ नये;  प्रशासनाचे आवाहन

(संग्रहित छायाचित्र)

करोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीपाठोपाठ कार्तिकी वारीतही सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत.

कार्तिकी वारीकाळात म्हणजेच २१ नोव्हेंबर ते १ डिसेंबपर्यंत चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. तसेच २५ ते २७ नोव्हेंबर असे तीन दिवस श्रीविठ्ठल आणि रुख्मिणीमातेचे मुखदर्शन बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.

करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून भाविकांनी पंढरीत येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दिवाळी पाडव्याला राज्यातील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली केली. मात्र, करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता सरकारने कार्तिकी वारीत पंढरीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली आहे.

दुसरीकडे फक्त पंढरपूरचे रहिवासी असलेल्यांना एस.टी.मधून पंढरीस येता येईल. इतरांना प्रवेशबंदी राहणार आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा दि. २६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी यात्रा कालावधीत पंढरीला येऊ नये, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 12:07 am

Web Title: orientation of shri vitthal in karthiki wari abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 धोक्याची घंटा! राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या वाढली
2 जनतेच्या नाराजीची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच व्यक्त केली नाराजी; भाजपाची मुख्यमंत्र्यांवर टीका
3 सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका – मुख्यमंत्री
Just Now!
X