21 September 2020

News Flash

वाघिणीच्या बछडय़ांकडून घोडय़ांची शिकार

वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. ६५५ मध्ये घोडे बांधून ठेवलेले होते. त्यांची शिकार या बछडय़ांनी केली

(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : पांढरकवडय़ातील टी-१ वाघिणीच्या बछडय़ांची शोधमोहीम सुरू असतानाच आज, सोमवारी या बछडय़ांनी घोडय़ाची शिकार केल्याची बाब उघडकीस आली आहे. वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून या घटनेला दुजोरा मिळाला आहे.

वाघिणीच्या मृत्यूनंतर बछडय़ांचे काय हा प्रश्न सर्वानाच होता. एक वर्षांचे देखील नसलेले हे बछडे जगतील की मरतील, असाच प्रश्न होता. २९ ऑक्टोबरला वाघिणीने शिकार केली होती आणि त्यानंतर अवघ्या तीन दिवसात तिला गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यामुळे या शिकारीवरच बछडे होते. एक वर्षांचे देखील नसलेले बछडे शिकार करू शकतील, असे कुणालाही वाटले नव्हते. वाघिणीच्या मृत्यूनंतर दोन वेळा बछडय़ांचा ठावठिकाणा मिळाला. त्यात टी-२ या वाघाच्या सोबतीने बछडे जगत असल्याचे स्पष्ट झाले. आज, सोमवारी वनविकास महामंडळाच्या कक्ष क्र. ६५५ मध्ये घोडे बांधून ठेवलेले होते. त्यांची शिकार या बछडय़ांनी केली. याठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या घटनेचे अस्पष्ट छायाचित्र कैद झाले आहे. टी-२ हा वाघ घटनास्थळापासून सात-आठ किलोमीटर लांब असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ही शिकार बछडय़ांनीच केली, यावर शिक्कामोर्तब झाले. वनखात्यासाठी ही घटना सकारात्मक असून वाघिणीचे बछडे त्याठिकाणी स्थिरावत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यांना जेरबंद करायचे की जंगलातच स्थिरावू द्यायचे, यावर अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 1:40 am

Web Title: orphaned cubs of tigress avni hunted horse in yavatmal forest
Next Stories
1 पत्नी, प्रेयसीला पैसे देण्यासाठी दरोडा
2 स्वच्छतेबाबत जागृती, पण कचरागाडय़ाच पोहोचत नाहीत!
3 भीक मागणाऱ्या मुलांना शाळेची गोडी
Just Now!
X