जिल्हा आणि परिसरातील रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय हा मुख्य आधार आहे. त्यामुळेच इथे उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्याही मोठी आहे. रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील लिफ्ट चक्क मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या अत्यवस्थ रुग्णांसह कर्मचारी आणि नातेवाइकांचीही चांगलीच दमछाक होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे वाढलेली रुग्णसंख्या आणि बंद असलेली लिफ्ट यामुळे अडचणीत आणखी भर पडली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय हे मुख्य रुग्णालय आहे. याच रुग्णालयाची मुख्य इमारत दोन मजली आहे. रुग्णालयात सुमारे चारशे कर्मचाऱ्यांसह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक असा मोठा राबता आहे. त्यात मागील दोन वर्षांपासून रुग्णालयातील सुरू असलेली एकमेव लिफ्ट बंद पडल्याने दररोज इमारतीच्या पायऱ्या चढत वर जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक तसेच रक्तदाब, अस्थमा, श्वासनाशी निगडित आजार , गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्या रुग्णांनादेखील पायऱ्या चढण्या उतरण्याखेरीज अन्य पर्यायच नाही. अनेक रुग्णांना पायऱ्यांमुले नाहक त्रास सहन करावा लागत आहे. होतो.

तळमजल्यावरून पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पेशंट कर्मचारी आणि नागरिकांना पायऱ्याचा वापर करावा लावतो. मागील दोन वर्षांपासून मुख्य इमारतीत असलेल्या दोन्ही लिफ्ट बंद असताना त्या दुरुस्त करण्याकरिता मात्र काहीच हालचाली दिसून येत नाहीत. रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत. त्यांनी या प्रकरणी लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांमधून पुढे येत आहे. लिफ्ट बंद असल्याने पायऱ्या वरूनच पायपीट करत उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे ह्रदयविकारा सारख्या रुग्णांना याचा जास्त त्रास होतो. त्यामुळे तात्काळ लिफ्ट दुरुस्त करावी अशी प्रतिक्रिया रुग्णाचे नातेवाईक इंद्रजित भालेकर यांनी दिली.