04 August 2020

News Flash

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग होणार शंभर खाटांचा

२५ हजार रॅपिड अँटिजिन टेस्ट किटलाही मंजुरी

(प्रातिनिधिक छायाचित्र)

“जिल्हा रुग्णालयातील कोविड दवाखान्यात सध्या २० खाटा उपलब्ध आहेत. पुढील दोन दिवसांत आणखी २५ नवीन खाटांचे काम पूर्ण होत आहे. आगामी पंधरा दिवसात अतिदक्षता विभागात शंभर खाटा उपलब्ध व्हाव्यात याकरिता काम प्रगतीपथावर आहे. ८१ नवीन व्हेंटिलेटर्सदेखील उपलब्ध झाले आहेत. आणखी १० व्हेंटिलेटर प्राप्त होत आहेत़. तसेच आरोग्य विभागाने उस्मानाबादसाठी रॅपिड अँटीजेन टेस्टच्या २५ हजार कीट खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे,” अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार गलांडे यांनी दिली.

“जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या लक्षात घेता २५ हजार रॅपिड अँटिजिन टेस्ट कीट खरेदीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. दोन दिवसात १० हजार नवीन कीट आरोग्य विभागाच्या ताब्यात मिळणार आहेत. त्यासाठी एकूण ५४ लाख रुपयांचा खर्च आला आहे. प्राप्त झालेल्या १० हजार नवीन कीट्स विविध रुग्णलाये, कंटेन्मेंट झोन, खाजगी दवाखाने आदी ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत,” असंही गलांडे म्हणाले. “उस्मानाबाद येथील प्रयोगशाळा सुरू झाल्याने तेथेही तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आले आहेत. या प्रयोगशाळेत दररोज दोन शिफ्टमध्ये ८४ नमुन्यांची चाचणी होणार आहे. पहिल्या दिवशी जिल्हा रुग्णालयातून २७ नमुने तपासणीसाठी प्रयोशाळेत पाठवले आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून अहवाल प्राप्त होईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सोयीसुविधांकडे विशेष लक्ष

करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीसाठी आरोग्य विभागाने सोयीसुविधांची कमतरता निर्माण होऊ नये याकडे विशेष लक्ष दिले आहे़. उपलब्ध असलेल्या मनुष्यबळावर तणाव येऊ नये यासाठी विभागीय स्तरावरून निवडण्यात आलेल्या उमेदवारांची कंत्राटी भरती सुरु केली आहे़. आवश्यकतेनुसार ६८ जणांना कंत्राटी स्वरूपाच्या सेवेत रुजू होण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. मात्र, केवळ ४२ जण कामावर रुजू झाले़ आहेत. करोनाचा संसर्ग वाढीस लागला असताना रुग्णांच्या सुश्रुषेसाठी कर्मचाऱ्यांची कमी भासू नये, यासाठी तात्पुरत्या स्वरुपात ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यासाठी अर्ज मागवून गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात आली होती.

इच्छुकांची संख्या मोठी

“मनुष्यबळाचा तुटवडा भरुन काढण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. निवड झालेले काहीजण प्रत्यक्षात रुजू झाले नाहीत. मात्र, तरीही इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अन्य निकषपात्र उमेदवारांची निवड लगेचच करता येऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता भासणार नाही. सध्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयांतील खाटांची संख्या, अतिदक्षता विभागातील सुसज्जता, ऑक्सिजन वितरण प्रणाली यासह आरोग्य सुविधा गतीने वाढविण्यात येत आहेत.”

डॉ. राजकुमार गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 5:31 pm

Web Title: osmanabad icu beds numbers will increase soon approval for rapid antigen kits jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 दीपिका, प्रियांकासहीत बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अडचणी वाढणार?; गृहमंत्र्यांनी केलं ‘हे’ वक्तव्य
2 “शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घाईगर्दीत घेऊ नये”
3 ‘महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाकडून भाजपाच्या आयटी सेलचा वापर’
Just Now!
X