31 October 2020

News Flash

उस्मानाबाद : पारधी वस्तीवरील दोन गटातील हाणामारीत दोघांचा मृ्त्यू

गुन्हा दाखल, तुंबळ हाणामारीत सख्या बहिणीचाही केला खून

प्रतिकात्मक छायाचित्र

उस्मानाबादमधील परांडा तालुक्यातील रोहकल येथील पारधी वस्तीवर दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत दोघांचा मुत्यु झाला आहे. या प्रकरणी अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रोहकल येथील पारधी वस्तीवर सख्या बहिणीचा पती व दोन भाच्यांनी मिळून दिगंबर उर्फ सुभाष रामा काळे याला जबर मारहाण केल्याने त्याचा उस्मानाबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मुत्यू झाला. मुत्यू झाल्याची माहिती पारधी वस्तीवर समजताच पुन्हा दोन गटात  जबर हाणामारी झाली. या हाणामारीत सख्या बहिणीचा गळा चिरून खून करण्यात आल्यची भयंकर घटना घडली.

‌रोहकल येथील पारधी वस्तीवर निवांता बिरक्या शिंदे व त्याचे कुटंब राहतात, त्याच ठिकाणी त्यांचा मेव्हणा समाधान रामा काळे व चार भाऊ देखील राहत आहेत. या दोन गटात गेल्या कांही दिवसापासून मागील भांडणाचा राग असल्याने त्याच्यात सतत किरकोळ कारणावरून भांडण सुरू होते. या भांडणावरूनच काळे व शिंदे कुटुंबात जोरदार हाणामारी झाली.

निवांता बिरक्या शिंदे व त्याच्या दोन मुलानी मिळुन सुभाष रामा काळे याला चाकुने भोसकल्याने, सुभाष काळे याला गंभीर अवस्थेत जखमी उस्मानाबाद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र  उपचारादरम्यान त्याचा मुत्यू झाला. ही बातमी रोहकलच्या पारधी वस्तीवर समजताच काळे व शिंदे गटात तुंबळ हाणामारी झाली. यात अनिता निवांत शिंदे या सख्या बहिणीचा समाधान काळे , बाळराजा काळे, बापूराव काळे, सुधीर काळे, रामा काळे  यांनी खून केला. या प्रकरणी अंभी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 22, 2020 5:44 pm

Web Title: osmanabad two persons were killed in a fighting between two groups msr 87
Next Stories
1 “पीक कर्ज वाटप न झाल्याने शेतकऱ्यांवर सावकाराच्या दारात जाण्याची वेळ”
2 MHT CET 2020 : उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या ‘सीईटी’ पुढे ढकलल्या
3 “मोदीजी, लष्करात जात, धर्म आणि प्रादेशिकवाद घुसवू नका”; ‘त्या’ विधानावरून जितेंद्र आव्हाड यांची टीका
Just Now!
X