18 September 2020

News Flash

उस्मानाबादेत महाविकास आघाडीला दणका

राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १७ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनेता दत्ता देवळकर आणि पक्षातील सदस्यांची माहिती दिलेली आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर सभापतींच्या निवडीतही महाविकास आघाडीला मोठा दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून निवडून आलेल्या १७ जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हाध्यक्षांनी बजावलेला पक्षादेश बाजूला ठेवून आम्ही राष्ट्रवादीचेच म्हणत सेना, भाजपशी युती केली आहे.

जिल्हा परिषदेतील सत्तेपुरती ही जमवाजमव झालेली असली, तरी या सभापतींच्या निवडी भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि सेनेतील नाराज आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वामुळे झाली आहे. अध्यक्षपदी भाजपच्या अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड यापूर्वी झाली. त्यानंतर शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम, कृषी व पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बालविकास समितीच्या सभापतिपदाची निवड पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे, काँग्रेसचे प्रकाश चव्हाण, ज्ञानेश्वर गीते व रत्नमाला टेकाळे यांनी सभापतिपदासाठी अर्ज दाखल केले होते.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे उमरगा तालुकाध्यक्ष कैलास िशदे यांचे चिरंजीव दिग्विजय िशदे, शिवसेनेकडून दत्ता साळुंके, राष्ट्रवादीकडून दत्ता देवळकर आणि पल्लवी खताळ यांनी अर्ज दाखल केले होते. निवड प्रक्रियेत ३० विरुद्ध २३ अशी मते सर्वाना मिळाली. त्यानुसार कृषी व पशुसंवर्धन सभापतिपदी शिवसेनेचे दत्ता साळुंखे, अर्थ व बांधकाम सभापतिपदी राष्ट्रवादीतून निवडून आलेले परंतु भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक दत्ता देवळकर यांची निवड झाली. समाजकल्याण सभापतिपदी भाजपाचे दिग्विजय शिंदे तर महिला व बालविकास सभापतिपदी राष्ट्रवादीच्या रत्नमाला टेकाळे यांची निवड झाली. निवडीनंतर पक्ष पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला.

आम्ही राष्ट्रवादीचेच
राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या १७ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गटनेता दत्ता देवळकर आणि पक्षातील सदस्यांची माहिती दिलेली आहे. आम्ही सर्व प्रशासकीय बाबी पडताळल्या आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटणारे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विचारानुसार आम्ही सभापतींच्या निवडणुका यशस्वी पार पडल्या आहेत. आम्ही सध्यातरी राष्ट्रवादीचेच आहोत. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांना पक्षादेश देण्याचा अधिकार नाही, असे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील व नवनिर्वाचित अर्थ व बांधकाम सभापती दत्ता देवळकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2020 4:57 pm

Web Title: osmanabad zp election mahavikas aghadi bjp shivsena nck 90
Next Stories
1 मेगा भरतीच्या विधानावर चंद्रकांत पाटील यांचा यु-टर्न
2 प्रगट मुलाखतीसाठी संजय राऊत बेळगावमध्ये दाखल
3 “संजय राऊत यांनी राहुल गांधींनाच अंदमानला जाण्याचा सल्ला दिलाय”
Just Now!
X