गेल्या पाच वर्षांपासून सातत्यानं एकमेकांची उणीधुणी काढणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर युती करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना-भाजपा युतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शिवसेनेमुळे एएनडीएची ताकद वाढल्याचे म्हटले आहे. त्याचप्रमाणे शिवसेना आणि भाजपाचे नाते राजकाराणापलिकडचे असल्याचेही त्यांनी सांगितले. यामध्ये त्यांनी शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाही उल्लेख केला आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये सोमवारी शिवसेना आणि भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकसभा आणि विधनसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत.

शिवसेनामुळे एनडीएचं सामर्थ्य आणखी वाढलं आहे. देश विकसित आणि सशक्त व्हावा, अशीच दोन्ही पक्षांची इच्छा आहे. या युतीला महाराष्ट्राची जनता साथ देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.’बाळासाहेब ठाकरे आणि अटलजी यांच्याकडून प्रेरणा घेत युती महाराष्ट्राच्या हितासाठी काम करेल. विकासचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणारे, भ्रष्टाचाराला थारा न देणारे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राची जनता पुन्हा एकदा निवडून देईल,’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पार्टी व शिवसेना आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक युती करून लढतील, असा निर्णय सोमवारी मुंबईत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी जाहीर केला. राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा युती जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व प्रकाश जावडेकर, शिवसेना नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना नेते आदित्य ठाकरे व उद्योग मंत्री सुभाष देसाई व्यासपीठावर उपस्थित होते. या युतीबद्दल बोलताना सामान्य माणसांचं, तळागाळातल्या लोकांचं, शेतकरी बांधवांचं हित राखण्यासाठी आम्ही घेतला आहे. अयोध्येत प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येत लवकरात लवकर झालंच पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती जी आम्ही मान्य केली आहे असंही भाजपाने सांगितलं.