01 March 2021

News Flash

“जितेंद्र आव्हाडांना हे कोण समजावणार?”; मुंब्र्यातील ‘त्या’ कार्यक्रमावरून टीका

करोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने काही निर्णय घेत, नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा काही प्रमाणात निर्बंध लागू झाले आहेत. मुंबईत करोना रुग्ण वाढीसाठी काही जण लोकल सेवेला जबाबदार धरतायत, तर ग्रामीण भागातील रुग्णवाढीसाठी ग्राम पंचायत निवडणुकीकडे बोट दाखवले जात आहे.

याच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे यांनी राजकीय पक्षांनीही गर्दी करणारी आंदोलनं, मोर्चे काढू नयेत. माझ्यासह महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांनाही पक्ष वाढवायचा आहे. पण हे करताना करोना संसर्ग वाढणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं. त्यानंतर आता भाजपाने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यक्रमाचा एक फोटो पोस्ट करुन, आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

“हा बघा जितेंद्र आव्हाड यांचा कार्यक्रम. ते आपल्या राज्याचे सन्माननीय गृहनिर्माणमंत्री आहेत. अशा कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाला नवं “घर” मिळतंय हे त्यांना कोण समजावणार? “असा प्रश्न उपस्थित करत जितेंद्र आव्हाड आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला टि्वट टॅग केले आहे.

नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर झालेल्या कार्यक्रमाचा एक फोटोही भाजपाने पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टि्वट टॅग केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2021 2:15 pm

Web Title: over rising corona cases bjp slam maharashtra housing minister jitendra awhad dmp 82
Next Stories
1 कृपा करा, कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका; अजित पवारांचं कळकळीचं आवाहन
2 मंगळापासून रायगडापर्यंत पाईपलाइन टाकता का?; भरसभेत उद्धव ठाकरेंचा सवाल
3 काँग्रेसमुळे वाण नाही पण गुण राऊतांना नक्की लागला – भातखळकर
Just Now!
X