News Flash

विखे यांच्या पाठपुराव्यातून शिर्डीत प्राणवायू प्रकल्प

तालुक्यात ३ ग्रामीण रुग्णालय, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालय मोठ्या संख्येने आहेत.

 

राहाता : कोविड संकटात मोठ्या प्रमाणात भेडसावलेल्या प्राणवायू तुटवड्यावर कायम स्वरूपी मार्ग काढण्यासाठी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयात सुमारे १ कोटी ५३ लाख रुपयांचा प्राणवायू प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्राणवायू खाटांअभावी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची झालेली ससेहोलपट झाली. त्यावर कायमस्वरूपी उत्तर म्हणून आ. विखे यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू  प्रकल्प उभारण्याची मागणी करून याचा पाठपुरावा शासनाकडे केला होता.

तालुक्यात ३ ग्रामीण रुग्णालय, ६ प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालय मोठ्या संख्येने आहेत. कोविड संकटाच्या दुसऱ्या संक्रमणात रुग्णांची संख्या वाढल्याने सर्वच आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला. कोविडसाठी सरकारी आणि खासगी  रुग्णालयांसह  शिर्डी संस्थानच्या व प्रवरा कोविड सेंटर मध्ये बेडची सुविधा उपलब्ध झाली असली तरी सर्वच ठिकाणी ऑक्सिजनच्या समस्येला सामोरे जावे लागले असल्याकडे आ. विखे यांनी लक्ष वेधले होते.

शिर्डी येथे संस्थानने प्रकल्प उभारला असला तरी  तिथे निर्माण होणारा प्राणवायू हा संस्थानच्या रुग्णालयालाच उपयोगी पडेल. त्यामुळे ग्रामीण रुग्णालय व इतर रुग्णालयांना पुन्हा प्राणवायूची  टंचाई भासण्याची  शक्यता गृहीत धरून कायम स्वरूपी ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्याची मागणी आ. विखे यांनी केली होती.

आ. विखे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन प्रशासनाने ग्रामीण रुग्णालय राहाता येथे १ कोटी ५६ लाख रुपये खर्चाच्या प्राणवायू प्रकल्प उभारणीस मंजुरी देऊन उभारणी कामाचा आदेश दिला आहे.

या प्रकल्पातून प्रतिदिन १२५ जम्बो प्राणवायू टाक्या भरण्याची क्षमता आहे. या प्रकल्पातून  प्राणवायू निर्मितीसाठी द्रवाची आवश्यकता नाही. हवेतूनच प्राणवायूची निर्मिती होणार असल्याची माहिती देतानाच, या प्रकल्पासाठी २०० के.व्ही क्षमतेची जनित्रे, येथील ग्रामीण रुग्णालयात ४० बेडच्या प्रकल्पासाठीच्या प्राणवायू पाइपलाइन करिता आमदार निधीतून निधीची उपलब्धता करून देणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:31 am

Web Title: overseas oxygen project in shirdi former minister mla radhakrishna vikhe akp 94
Next Stories
1 टाईप-१ प्रकारातील मधुमेही मुलांना म्युकोरमायकोसिसचा धोका
2 मराठा आरक्षण आंदोलनात भाजप सहभागी होणार
3 Congress Toolkit : काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते? – देवेंद्र फडणवीस
Just Now!
X