ट्रिपल तलाकचा निषेध करत असून शबरीमला मंदिराच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊनही धार्मिक भावनेचा आधार घेऊन अंमलबजावणी होत नाही, हा दुटप्पी पणा नाही का? असा सवाल खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी उपस्थित करीत भाजपवर निशाण साधला. हा देश हिंदूमुळे नाही तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे धर्मनिरपेक्ष असल्याचे यावेळी ते म्हणाले. पुण्यात वर्ल्ड काऊंट फेस्टिवल दरम्यान प्रफुल्ल केतकर यांनी एमआयएमचे नेते आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांची सेक्युलॅरीजम इन इंडिया या विषयावर मुलाखत घेतली.

यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, शबरीमाला प्रकरणात राज्य धार्मिक पातळीवर तटस्थ असले पाहिजे. न्याय, समता , धर्मनिरपेक्षता या मुद्द्यांपेक्षाही भाजपमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही. अशी खंत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रात आणि कर्नाटकात एकही मुस्लिम खासदार नाही 24% लोकसंख्या मुस्लिमांची आणि केवळ 22 खासदार आहेत. असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, प्रणव मुखर्जी राष्ट्रीय संघाच्या सरसंघचालकांना काय भेटतात आणि त्यांना लगेच भारतरत्न अवॉर्ड दिला जातो. अशा शब्दात त्यांनी मोदीवर निशाणा साधला. हाऊ टू जोश ऐवजी देशातील तरुण हाऊ टू जॉब विचारत आहे. यावर हे सरकार काही बोलताना दिसत नाही. त्याचबरोबर पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांनी केलेली अटक चुकीची होती. अशा शब्दात त्यांनी पोलिस यंत्रणेच्या कारवाईवर देखील सडकून टीका केली.