पुण्यातील राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वारजेमधील कात्रज देहूरोड बाह्यवळण असलेल्या राजमुद्रा हॉटेलचे मालक अमर कणसे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली? याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. वारजे पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहेत.