News Flash

नितीन गडकरी यांच्या सहकार्याने २५ प्राणवायू कॉन्स्ट्रेटर उपलब्ध

बल्लारपूर, मील, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रुग्णालयांसाठी २५ प्राणवायू कॉन्स्ट्रेटर ४ मे रोजी वितरित करण्यात आले.

चंद्रपूर : केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने बल्लारपूर, मूल, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रुग्णालयांसाठी २५ प्राणवायू कॉन्स्ट्रेटरचे वितरण माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

बल्लारपूर, मील, पोंभुर्णा आणि चंद्रपूर येथील रुग्णालयांसाठी २५ प्राणवायू कॉन्स्ट्रेटर ४ मे रोजी वितरित करण्यात आले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री गडकरी यांनी २५ प्राणवायू कॉन्स्ट्रेटर उपलब्ध करून दिले आहे. याआधी आमच्या विनंतीला मान देत चंद्रपूर जिल्ह्य़ातील जनतेच्या आरोग्य सुविधेच्या दृष्टीने गडकरी यांनी १५ एनआयव्ही, २ मिनी व्हेंटिलेटर आणि १५ मोठे व्हेंटिलेटर जिल्हा रुग्णालयाला उपलब्ध करून दिले आहेत. लवकरच आणखी १५० प्राणवायू कॉन्स्ट्रेटर उपलब्ध होणार असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी गडकरी यांचे आभार मानले. यावेळी पोंभुर्णा पंचायत समितीच्या सभापती अलका आत्राम, जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, मूल नगरपरिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, नीलेश खरबडे, समीर केणे, मनीष पांडे, सुभाष कासनगोट्टुवार, किशोर कापगते, प्रशांत समर्थ, अजित मंगळगिरीवार, ऋषी कोटरंगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 12:27 am

Web Title: oxygen constructors available in collaboration nitin gadkari ssh 93
Next Stories
1 प्राणवायूची गळती थांबवण्यात प्रशासनाला यश
2 करोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जाणीव, जागृतीसह खबरदारी मोहीम
3 जीवरक्षक प्रणाली वापराविना?
Just Now!
X