राजकारणाबद्दल मला फारशी उत्सुकता नाही, मात्र मी यंदाच्या निवडणुकीत मतदान मात्र नक्कीच करणार आहे, हे उत्तर आहे प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतचे. कंगनाच्या हस्ते शुक्रवारी दुपारी शहराच्या सर्जेपुरा चौकातील ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’ या दालनाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी तिने देशभर सुरू झालेल्या लोकसभा रणधुमाळीसंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला कंगनाने असे सफाईदारपणे टोलवले.
१८२ वर्षांच्या दाजीकाका गाडगीळ एंटरप्रायजेस या पेढीची देशातील ही नगरची १२वी शाखा आहे. पेढीचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी कंगनाचे स्वागत करत पेढीची, दालनाची व गुंतवणूक योजनेची माहिती दिली. सुमारे अडीच हजार चौरस फूट जागेत उभारलेल्या या दालनात पारंपरिक व आधुनिक दागिन्यांचा समावेश करण्यात आला आहे. नगर ही सोन्याची मोठी बाजारपेठ आहे. नगरकरांना विश्वासार्ह, फॅशनेबल दागिने उपलब्ध होतील. लवकरच लग्नसराईचा मोसम सुरू होत आहे, त्यामुळे नगरकर चांगला प्रतिसाद देतील, असा विश्वास गाडगीळ यांनी व्यक्त केला. पुणे व औरंगाबादपेक्षा नगरच्या दालनातील किमती काही प्रमाणात कमी असतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
‘पु. ना. गाडगीळ’ला वैभवशाली परंपरा असल्याचा उल्लेख कंगनाने केला. प्रत्येक महिलेला दागिन्यांचा शौक असतो, दागिना भेट मिळाला की ती खूश होते असे तिने स्वत:चे उदाहरण देऊनच सांगितले.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आपल्या ‘क्वीन्स’ चित्रपटाला मिळालेल्या यशाबद्दलही ती बोलली. सध्या आपण ‘तनू वेड् मनू-२’ या सिक्वेलच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे तिने सांगितले. कंगनाच्या हस्ते दालनाच्या ‘इ-शॉपिंग’च्या संकेतस्थळाचेही उद्घाटन करण्यात आले. या वेळी पराग गाडगीळ उपस्थित होते.

dombivli, akhil bhartiya brahman mahasangh
जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश
Sanjay Raut Manoj Jarange
महाविकास आघाडी मनोज जरांगेंना जालन्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवणार? वंचितच्या प्रस्तावावर संजय राऊत म्हणाले…
water shortage in Pune
लोकजागर : पाणीकपात करा…