चार पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जमातीसाठी राखीव

पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी शनिवार, १५ फेब्रुवारी रोजी निवडणुका होणार आहे. चार पंचायत समितींचे सभापतीपद अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी तर तीन पंचायत समितींचे सभापतीपद अनुसूचित जमातीच्या सदस्यांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. वसई पंचायत समितीचे सभापतीपद इतर मागासवर्गीय महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे.

Deputy Chief Minister Ajit Pawar also applied for Lok Sabha from Baramati
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही बारामतीतून लोकसभेसाठी अर्ज… झाले काय?
Maha Vikas Aghadi,
वसई विरारमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ, शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचा भाजपावर घणाघात
Rahul Gandhi
पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी इच्छुक?
RSS claims of support to Congress in Lok Sabha elections
‘आरएसएस’चा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पाठिंब्याचा दावा, जाणून घ्या सविस्तर…

जिल्ह्यातील विविध पंचायत समितीच्या सभापतीपदांसाठी शनिवारी सकाळी ११ ते १ दरम्यान नामनिर्देशन पत्र दाखल करावयाची असून आवश्यकता भासल्यास दुपारी तीन वाजल्यानंतर याकरिता मतदान घेण्यात येणार आहेत. मोखाडा, डहाणू, विक्रमगड व पालघर येथे अनुसूचित जमातींच्या महिलांसाठी सभापतीपद राखीव असून जव्हार, वाडा व तलासरी येथे अनुसूचित जमातीचे सभापती निवडले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व सभापतीपद आरक्षणाच्या कक्षेत असल्याने उपसभापतीपदासाठी उमेदवारी मिळण्यासाठी विविध पक्षांमधील पंचायत समिती उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक १७ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

कुणाचे वर्चस्व?

पालघर पंचायत समितीत शिवसेना तर तलासरी येथे मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निर्विवाद बहुमत आहे, तर डहाणू, विक्रमगड, वाडा येथे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात समझोता झाला तरच सत्ता स्थापन होऊ  शकते, अशी परिस्थिती आहे. पालघर पंचायत समितीच्या ३४ जागांपैकी शिवसेनेच्या ताब्यात २४ जागा असून पालघर पंचायत समितीवर भगवा फडकणे जवळपास निश्चित झाले आहे. डहाणू पंचायत समितीच्या २६ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ  तर शिवसेनेचे आठ ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. डहाणूमध्ये भाजपाचे सात तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. वाडा येथील १२ जागांपैकी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी चार उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजपचे दोन सदस्य आहेत. विक्रमगड तालुक्यातील दहा जागांपैकी राष्ट्रवादी चार, भाजपाचे दोन, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व शिवसेनेच्या प्रत्येकी एक आणि दोन अपक्ष असे बलाबल आहे. तलासरीच्या १० जागांपैकी माकपकडे आठ जागा जिंकून निर्विवाद बहुमत असून भाजपाच्या दोन सदस्य निवडून आले आहेत. मोखाडा येथील सहा जागांपैकी शिवसेनेकडे पाच राष्ट्रवादीकडे एक सदस्य संख्या आहे. तर जव्हार तालुक्यातील आठ जागांपैकी भाजपकडे चार शिवसेनेकडे तीन तर माकपकडे एक सदस्य असे बलाबल आहे. वसईतील आठ जागांपैकी शिवसेना व बहुजन विकास आघाडीकडे प्रत्येकी तीन तर भाजपकडे दोन असे बलाबल आहे.