News Flash

शब्दातही व्यक्त करता येत नाही इतका आनंदाचा क्षण – बाबासाहेब पुरंदरे

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. आनंद इतका आहे की तो शब्दात व्यक्तही करता येत नाही.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

पद्मविभूषण पुरस्कार जाहीर होणे हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. आनंद इतका आहे की तो शब्दात व्यक्तही करता येत नाही अशा भावना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबसाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केल्या. जन्माला आल्यानंतर समजायला लागलं तेव्हा एवढं कळलं की, आपण ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात आहोत. तेव्हा आपण कधी स्वतंत्र होणार आहोत का ? असे विचार मनात यायचे. ज्यादिवशी देश स्वतंत्र झाला तेव्हा एकदम वेगळं वाटायला लागलं. आपण वेगळया जगात प्रवेश केला आहे असे वाटायला लागले. त्या आनंदाचा पेढा आज तुळजाभवानीने माझ्या हातावर ठेवलाय असे वाटते अशी भावना बाबासाहेबांनी व्यक्त केली.

गेल्या ५० वर्षात जे शिवचरित्र नव्याने उमगलय कागद किंवा जे नवं काही सापडलय ते वाचक, अभ्यासकांच्या पुढे ठेवावं अशी इच्छा आहे. या क्षणाला मला माझ्या वडिलांची आणि गुरुंची आठवण येत आहे. जे त्यांनी शिकवलं, वेळच्या वेळी रागावले त्याचा फायदा झाला त्याच श्रेय हे त्यांनाच आहे असे बाबासाहेब म्हणाले.

१९५४ साली नगरहवेली आम्ही काबजी केली. ते पावसाळयाचे दिवस होते. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला हा प्रदेश आम्ही हल्ला करुन जिंकला. त्यावेळी पावसाचे आणि डोळयातले पाणी कुठले हे कळत नव्हते. त्यावेळी जो आनंद झाला होता. आज पुरस्कार मिळाल्यानंतरही तसाच आनंद झाला आहे असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.

शिवचरित्रासाठी गडकोटाची भ्रमंती सुरु केली तेव्हा कधी पुरस्कार मिळेल असा विचारही मनाला शिवला नाही. पुरस्कारामुळे आणखी शिवकार्य करण्याची ऊर्जा मिळाली. आता जास्तीत जास्त अभ्यास करुन लोकांसमोर ठेवणार असा बाबासाहेबांनी सांगितले.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बाबासाहेबांना अभिनंदनाचे अनेक फोन आले. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुद्धा फोन होता. आपल्याला मिळालेल्या पुरस्कारामुळे राज ठाकरेंनाही प्रचंड आनंद झाला आहे असे बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 1:57 am

Web Title: padma vibhushan award is happiest moment of life babasaheb purandare
Next Stories
1 सोलापुरात वातानुकूलित सार्वजनिक स्वच्छतागृह
2 नीरव मोदीच्या किहीम येथील बंगल्यावर हातोडा
3 पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाची शाळांवर सक्ती
Just Now!
X