News Flash

पालघर – चारोटी उड्डाण पुलावर केमिकलचा टँकर उलटला

घटनास्थळी पोलीस दाखल, अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं

मुबंई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावर ज्वलनशील रसायनाने भरलेला एक टँकर उलटला. आज (शुक्रवार) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

टँकर उलटल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायन वाहू लागले. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहचले असून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आहे .

गुजरातहून मुबंईच्या दिशेने जाणारी वाहतूक सर्व्हिस रोड वरून वळवण्यात आली आहे. त्यामुळे उड्डाणपुलाजवळ वाहतूक कोंडी होऊन वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 6:19 pm

Web Title: palghar a chemical tanker overturned on the charoti flyover msr 87
Next Stories
1 नांदेडमध्ये गावठी पिस्टल, जिवंत काडतुसासह फिरणाऱ्यास पकडले
2 बदनामीच्या भितीपोटी एसटीत वाहकाची आत्महत्या
3 “बदनामी थांबली नाही तर आम्हाला आत्महत्याच करावी लागेल”, पूजा चव्हाणच्या वडिलांचा इशारा!
Just Now!
X