News Flash

विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

कनिष्ठ महाविद्यालय होऊनही शिक्षकपदांना मंजुरी नाही

(संग्रहित छायाचित्र)

नीरज राऊत

आदिवासी क्षेत्रातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी प्राप्त होऊन त्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळांना कनिष्ठ महाविद्यालयाचा दर्जा देण्यात आला. मात्र, श्रेणी वाढवताना शिक्षकांची पदे भरण्याकडे दुर्लक्ष झाल्याने परिणामी  मानधनावरील शिक्षकांकडून मिळणाऱ्या ज्ञानदानावर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवित आहेत.

ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्प क्षेत्रात चाबके तळावली, हिरडपाडा, परळी, शिगाव व साखरे या माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांना सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षांपासून अकरावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा शासन निर्णय १० जून २०१९ मध्ये घेण्यात आला. त्या अनुषंगाने या सर्व पाच आश्रमशाळांमध्ये कला व विज्ञान विषयांसाठी ५० विद्यार्थ्यांंच्या दोन तुकडय़ा कार्यरत झाल्या आहेत.  सद्यस्थितीत या आश्रमशाळांमध्ये ८०० ते १००० विद्यार्थी अकरावी व बारावी इयत्तेत शिक्षण घेत आहेत.

सप्टेंबर २०१९ अखेरीस असलेल्या पटसंख्येच्या आधारे तसेच आकृतिबंधाप्रमाणे शिक्षकांची भरती करण्यास  शासनाने मंजुरी दिली आहे.  या पदांकरिता आवश्यक ती परवानगी घेऊन संबंधित आश्रमशाळांनी टप्प्याटप्प्यात भरती प्रक्रिया आरंभली आहे. मात्र, अजूनपर्यंत मुलाखती होऊ न शकल्याने प्रत्यक्षात शिक्षकांची भरती झालेली नाही. ही शिक्षक भरती करण्याबाबत प्रकल्प व आयुक्त कार्यालय स्तरावरून स्पष्ट माहिती देण्यात येत नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांंसाठी परीक्षेला बसण्यासाठी इंडेक्स नंबर घेणे व इतर बाबींकरिता अनेक अडचणी समोर येत आहेत.  अशा आदिवासी विद्यार्थ्यांंना ज्ञानदानाचे काम मानधनावरील शिक्षक करीत आहेत.

यासंदर्भात करोना संक्रमणाचे कारण पुढे आणले जात आहे. कनिष्ठ महाविद्यालय उघडण्याची प्रक्रिया जून २०१९ म्हणजे करोना संक्रमणाच्या पूर्वी सुरु केल्याचे शिक्षण संस्थेच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. भरती प्रक्रिया सुरू केल्यानंतर  करोना टाळेबंदीचे कारण पुढे करण्यात आले. परिणामी शिक्षकांच्या मुलाखती व इतर प्रक्रिया  करण्यास  विलंब झाल्याने त्याचा फटका आदिवासी विद्यार्थ्यांंना बसत आहे.

लोकप्रतिनिधींबद्दल नाराजी

शासकीय आश्रमशाळा व पेसा क्षेत्रामधील शाळा-कनिष्ठ महाविद्यालयाकरिता विशेष भरती कार्यक्रम २०१९-२० दरम्यान राबवण्यात आल्याचे सांगण्यात आले.  यावेळी कनिष्ठ महाविद्यालयात पदासाठी भरती करण्यात आल्याची माहिती देण्यात येते. पाच अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील पदभरती करण्यासाठी ना हरकत पत्र देण्यात आल्याचे ठाणे आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले आहे. मात्र अशा प्रकारचे कोणतेही पत्र प्रकल्प स्तरावर प्राप्त झाले नाही अशी माहिती देण्यात येते.   लोकप्रतिनिधी या बाबीकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे संस्थाचालकांचे म्हणणे असून त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:51 am

Web Title: palghar despite being a junior college teaching posts are not sanctioned abn 97
Next Stories
1 आरोग्य विभागाला अतिरिक्त कामाचा ताप
2 Coronavirus – राज्यात दिवसभरात ३ हजार ७२९ नवे करोनाबाधित, ७२ रुग्णांचा मृत्यू
3 पुणे-बंगळुरु महामार्गावर दोन एसटी बसच्या अपघातात नऊ जखमी
Just Now!
X