पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या ५ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे सूर्या नदीवरील धामणी धरण ९५ टक्के भरले आहे. या धरणाचे पाचही दरवाजे ३ फुटापर्यंत उघडण्यात आले असून १६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
या विसर्गामुळे धामणी धरणाच्या खालच्या बाजूला असणारा कवडास उन्नती बंधारा ओव्हरफ्लो झाला असून त्यातून ४२,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
आठवडाभर सातत्याने जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने सुर्या नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या कालावधीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहनही धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2019 2:40 pm