News Flash

करोना उपचारपद्धतीत आता पारदर्शकता

काळजी केंद्रांत सीसीटीव्ही बसविण्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

काळजी केंद्रांत सीसीटीव्ही बसविण्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पालघर : समर्पित करोना रुग्णालयात बाधित असलेल्या नागरिकांवर उपचार होत असताना त्यात पारदर्शकता आणण्यासाठी सर्व केंद्रांत सीसीटीव्ही व्यवस्था तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले. करोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींकडे पाहून या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाला सूचित केले.

बोईसर दौऱ्यावर असताना डॉ. माणिक गुरसळ यांनी टीमा येथील करोना समर्पित रुग्णालयाला बुधवारी सायंकाळी भेट दिली. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा सुरू नसल्याचे आढळल्यानंतर त्यांनी संबंधितांना सूचना दिल्या.रुग्णावर कशा प्रकारे उपचार सुरू आहेत, तसेच त्याची सद्यस्थिती काय आहे याबाबतची माहिती बाहेर येणाऱ्या त्याच्या नातेवाइकाला दिसायला हवी, असे मत त्यांनी आरोग्य यंत्रणेसमोर व्यक्त केले. असे केल्यास रुग्ण दगावल्यानंतर निर्माण होणारे अनेक प्रश्न उद्भवणार नाहीत, असे त्यांनी सूचित केल्याचे सांगितले. जिल्ह्यात उपचारासाठी आवश्यक औषधसाठा तसेच इंजेक्शनचा साठा उपलब्ध असल्याचे व सर्व संबंधित औषधांचा आढावा जिल्हा प्रशासन दररोज घेत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच रुग्णसंख्या व त्यांची स्थिती पाहता आवश्यक इंजेक्शन्सची खरेदी केल्याची माहिती त्यांनी दिली.

त्रुटी दूर करण्यावर भर

उपचार घेणाऱ्या रुग्णांची मानसिक स्थिती चांगली ठेवण्यासाठी टीव्ही बसवण्यात आले असले तरीसुद्धा ही व्यवस्था पुरेशी नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रुग्णांना त्यांच्या मोकळ्या वेळेत गुंतवून ठेवण्यासाठी काही व्हिडीओ गेम्स वा अन्य करमणुकीची साधन समर्पित करोना रुग्णालयात वाढविण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या.पालघर जिल्ह्यात कृत्रिम श्वसन यंत्रणा पुरेशा संख्येने उपलब्ध असल्या तरी डॉक्टरांची  संख्या कमी आहे. त्यामुळे ही यंत्रणा कार्यरत ठेवणे कठीण होत असल्याचे ते म्हणाले. पालघरमधील खासगी सेवेतील डॉक्टरांशी व्यक्तिगत चर्चा करून त्यांना करोना रुग्णसेवेत सामावून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात जिल्ह्यातील सर्व समर्पित करोना उपचार केंद्रांना पूर्वसूचना न देता भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:31 am

Web Title: palghar district collector orders to install cctv in covid care centers zws 70
Next Stories
1 नगरमध्ये जनता संचारबंदीच्या निर्णयास राजकीय वादाचा संसर्ग
2 सांगलीत काँग्रेस विरुद्ध जयंत पाटील
3 किसान रेल्वेतून उत्तर भारतात अकराशे टन डाळिंबाची वाहतूक
Just Now!
X