08 March 2021

News Flash

पालघर : गृहमंत्री अनिल देशमुख यांची गडचिंचले गावास भेट

पालघर जिल्ह्यातील या हत्याकांडप्रकरणी 116 जणांना अटक करण्यात आलेली आहे.

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे दोन साधू व त्यांच्या चालकाची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 20 दिवसानंतर घटनास्थळाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांच्यासोबत अधिकारी वर्ग व कार्यकर्त्यांचा गराडा असताना प्रसार माध्यमांना मात्र प्रवेश व चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला होता.

या हत्याकांडाप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कासा पोलीस ठाणे आणि गडचिंचले येथील घटनास्थळास भेट दिली. 11 वाजेपासून सुमारास गावात पोहोचल्या नंतर त्यांनी सरपंच, काही ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांशी चर्चा केल्याचे सांगण्यात येते. या प्रसंगी  जिल्हा परिषदेचे सभापती व काशिनाथ चौधरी, विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा, खासदार राजेंद्र गावित आणि स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची त्यांच्या सोबत उपस्थिती होती.गृहमंत्री व कार्यकर्त्यांना पोलिसांनी गावात सोडल्यानंतर प्रसार माध्यमांना काही अंतरावर पोलिसांकडून रोखण्यात आले.

या प्रकरणात 116 जणांना अटक झाली असून यामध्ये 9 अल्पवयीन आहेत. तर या प्रकरणी कासा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून इतर 35 कर्मचाऱ्यांच्या जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत. या वेळी गृहमंत्री देशमुख यांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी वर्गासोबत बैठकीदरम्यान चर्चा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 1:53 pm

Web Title: palghar home minister anil deshmukh visits gadchinchale village msr 87
Next Stories
1 देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी: म्हणाले, “शाहू महाराजांचा अनादर करण्याचं मनात सुद्धा येऊ शकत नाही”
2 ‘पैसेच संपले आता मुलाला कसं खाऊ घालायचं?’ एका आईचा उद्विग्न सवाल!
3 पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी अमित ठाकरेंची उद्धव ठाकरेंशी चर्चा
Just Now!
X