पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या २४ तासांत करोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर नवे  ६५६ रुग्णवाढ झाली आहे. मृतांपैकी आठ रुग्ण पालघर तालुक्यातील असून वाडा व डहाणू तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. ग्रामीण भागातील उपचाराधीन रुग्ण संख्या ६६५६ वर पोहोचली आहे.

२४ तासांत झालेल्या रुग्ण वाढीत पालघर तालुक्यातील ४२३ रुग्णांचा समावेश असून इतर तालुक्यांमध्ये सरासरी ३० ते ५० रुग्ण वाढ झाल्याचे दिसून आले आहे. उपचाराधीन असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांपैकी पालघर तालुक्यात ३३८७, जव्हार १०५५ तर  डहाणू तालुक्यात ८८३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील सरासरी मृत्यू दर १.५१ टक्क्यावर  पोहोचला असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढत आहे. उपचाराधीन रुग्णांपैकी ४०६७ रुग्ण गृह विलगीकरणात असून १२६९ रुग्ण जिल्ह्याबाहेर उपचार घेत आहेत.

‘प्रतिजन’ तपासणीत वाढ

जिल्ह्यातील ‘आरटीपीसीआर’ तपासणी निकालासाठी विलंब लागत असल्याने जिल्ह्यातील ‘प्रतिजन’ तपासणीची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.  सोमवारी केलेल्या ३४३७ नागरिकांची प्रतिजन तपासणीत ७८५ नागरिक करोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.