पालघर नगरपरिषदेने टाळेबंदीत नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्रीसाठी बायर-सेलर (BUYER-SELLER) ॲप तयार केले असून यामार्फत ऑर्डर केलेल्या वस्तू एका क्लिकवर घरातून बाहेर न जाता घरपोच मिळणार आहे. पालघरवासियांना घराबाहेर पडायला लागू नये यासाठी हे ॲप तयार करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी दिली.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या टाळेबंदीदरम्यान पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांना घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करायला लागू नये यासाठी पालघर नगरपरिषदेमार्फत अशा खरेदी विक्रीसाठी हे ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे नागरिकांना कोणत्याही जीवनावश्यक वस्तू दुकानदारामार्फत घरपोच पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे या टाळेबंदी दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये, हा हे अॅप तयार करण्यामागचा उद्देश असल्याचे नगरपरिषदेने म्हटलं आहे.

Health Special, Pregnancy , dohale,
Health Special: गरोदरपणा आणि डोहाळे; किती खावे, काय टाळावे?
Fatty Liver Can Happen Without Drinking Alcohol Check These Changes Signs
मद्यपान न करताही होतो फॅटी लिव्हर; भूक, लघवीचा रंग व त्वचेसह ‘या’ ८ बदलांमधून शरीर देतं संकेत, उपचार काय?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
Addicted to junk food and can’t seem to stop Here’s how to overcome it
तुम्हाला जंक फूड खाण्याचे व्यसन आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कशी सोडावी ही वाईट सवय

हे ॲप अॅंड्राईडच्या ‘प्ले स्टोर’वर उपलब्ध असून येथून पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिक हे (बायर-सेलर) ॲप डाऊनलोड करू शकतात. तसेच http://prabaltechnologies.com/buyerseller/ या लिंकवर जाऊन सुद्धा हे ॲप डाऊनलोड करता येईल. ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते हाताळणे सर्वांसाठी सोयीस्कर आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर नागरिकांना आपली सामान्य माहिती त्यात भरावयाची असून ॲपच्या माध्यमातून ग्राहक आपल्या वस्तूंची यादी जवळच्या विक्रेत्याला पाठवून त्या विक्रेतामार्फत वस्तूंची सेवा घरपोच मिळवता येईल.

किराणा, भाजीपाला, दूध व दुग्धजन्य पदार्थ, बेकरी पदार्थ, मटण दुकाने आदी प्रकारातील कोणत्याही वस्तू या अॅपमार्फत ग्राहकांना घरबसल्या मागवता येणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून मागवलेल्या वस्तू रोख रकमेने घेता येणार आहेत किंवा संबंधित विक्रेत्याकडे ई-पेमेंट सुविधा उपलब्ध असल्यास त्यानुसार त्याला पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमध्ये नागरिकांनी बाहेर न पडता या ॲपचा वापर करून आपल्याला हव्या असलेल्या जीवनावश्यक वस्तू मागविण्याचे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.