07 March 2021

News Flash

पालघर: साधू हत्याकांडप्रकरणी पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर; गृहमंत्र्यांचे आदेश

याप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते.

संग्रहित छायाचित्र

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले भागात झालेल्या साधू हत्याकांडप्रकरणी पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केला आहे.

१६ एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे हत्या करण्यात आली होती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज या भागाचा दौरा केला व गावच्या सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, लोकप्रतिनिधी व नागरिकांशी संवाद साधला.

हे हत्याकांड माणुसकीला काळीमा फासणारे असल्याचे सांगून याप्रकरणी दोषी म्हणून पालघरच्या पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय गृहमंत्र्यांनी मुंबई येथे परतल्यानंतर जाहीर केला. पालघर जिल्ह्याचा कारभार जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांच्याकडे सोपवला असल्याचे त्यांनी जाहीर केले.

याप्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे दोन अधिकारी व तीन कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले होते. जिल्ह्यातील ३५ कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात इतरत्र बदली करण्यात आली होती. या हत्याकांड प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण विभागाकडून करण्यात येत असून या चौकशीचा लवकरच अहवाल प्राप्त होईल, असं गृहमंत्र्यांनी पालघरमध्ये पत्रकारांना सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2020 10:06 pm

Web Title: palghar superintendent of police on compulsory leave in sadhu murder case home ministers order aau 85
Next Stories
1 महाराष्ट्रात आज १३६२ नवे करोना रुग्ण, संख्या १८ हजाराच्याही पुढे
2 महाराष्ट्रातील स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यासाठी आरोग्य प्रमाणपत्राची गरज नाही-राजेश टोपे
3 धक्कादायक! विलगीकरणातील लोकांना दारूचा पुरवठा; तिघांवर गुन्हा दाखल
Just Now!
X