पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होऊन शिवसेनेच्या भारती कामडी विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसने सुचवलेले अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

पालघर जिल्हा परिषदेसाठी त्रिशंकू झालेल्या निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी झाली होती. दुसरीकडे, भाजपातर्फे अध्यक्ष पदासाठी सुरेखा थेतले व उपाध्यक्ष पदासाठी जयवंत डोंगरकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडीच्यावतीने अध्यक्षपदासाठी मनिषा बुधर (कम्युनिस्ट पक्ष) व उपाध्यक्षपदासाठी विष्णू कडव (बविआ) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Wrong campaign, gangster type people
कल्याण पूर्वेत गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून खासदार शिंदेंचा अपप्रचार, भाजपच्या वरिष्ठांनी दखल घेण्याची जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांची मागणी
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

या नवीन जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे १८, राष्ट्रवादी काँग्रेस १४, भाजपाचे १२, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे – ५, बहुजन विकास आघाडीचे -४, काँग्रेसचा एक तर तीन अपक्ष सदस्य निवडून आले होते. यातील प्रत्येकी एका अपक्ष सदस्याने राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष व बहुजन विकास आघाडी त्यांना पाठिंबा दिल्याने, शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ ३३, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष- बहुजन विकास आघाडीचे संख्याबळ- ११ तर भाजपाचे १२ सदस्य यांच्यात निवडणूक होणार होती.
मात्र, निवडणुकीच्या रिंगणातील इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने भारती कामडी व नीलेश सांबरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांनी जाहीर केले.