पालघर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा कनिष्ठ सहायक प्रकाश पागी यास सहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलूपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर पथकाने रंगेहात पकडले असून, त्याला अटक करण्यात आली आहे.

तक्रारदारकडून एका कामाचे देयक काढून घेण्यासाठी पागी याने सहा हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत विभागाला कळविल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची तथ्यता तपासली असता, लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

त्यानुसार लाचलूचपत विभागाने बांधकाम विभागाच्या कार्यालयात सापळा रचून प्रकाश पागी यास रंगेहात लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक भारत साळुंखे व सहकारी कर्मचाऱ्यांनी केली.