27 May 2020

News Flash

पाली : सारसगडावर दोन प्रवेशद्वाराचे झाले लोकार्पण

या कार्यक्रमात रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी दुर्ग संवर्धन व शिवरायांवरील पोवाडे सादर केले.

अष्टविनायकांपैकी एक अशा प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पाली गावाचा पहारेकरी असलेल्या सरसगडावर दोन प्रवेशद्वाराचे लोकार्पण झाले. किशोरभाई धारिया व विश्वजित फडते यांच्या शुभ हस्ते गुरूवारी सकाळी ९:३०वा गडावर दोन्ही प्रवेशद्वाराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. मान्यवरांनी सह्याद्रीच्या कार्याचे कौतुक करत यापुढेही आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगितले.

या कार्यक्रमात रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांनी दुर्ग संवर्धन व शिवरायांवरील पोवाडे सादर केले. यावेळी किशोरभाई धारिया(दरवाज्याचे दातृत्व)विश्वजित फडते(स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील सिद्दी खैरियत भूमिका) श्री मंगेश भाई, सरपंच पाली ग्रामपंचायत(बल्लाळेश्वर मंदिर अध्यक्ष हे उपस्थित होते.

कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल सहा जणांना “दुर्ग प्रेरणा सन्मान” देण्यात आला.
1)जितेंद्र गायकवाड (उत्कृष्ट चित्रकार)
2) विशाल पाटील ( माजी सैनिक)
3) मंगेशभाई दळवी(सामाजिक कार्य)
4)भजनसम्राट श्री गणेशबुवा देशमुख(भजन)
5)आकाश लोणारे
6)गणेश गिध(सह्याद्रीतील रेस्क्यू कामगिरी बद्दल)

 

संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांनी शिप्रेमींना मार्गदर्शन करत संस्थेच्या पुढील कार्यक्रम व वाटचालीची माहिती दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 10:53 am

Web Title: pali sarasgad fortentry door inauguration nck 90
Next Stories
1 मी गाडी घेतली की, लिंबाचं सरबत करून पाजतो; ओवेसींनी डागली तोफ
2 ‘राज’नीती बदलणार? : ‘लाव रे तो व्हिडीओ’ की दुसरं अस्त्र काढणार
3 ठाण्यात मनसेचं इंजिन घड्याळावर चालणार
Just Now!
X