News Flash

पंढरपूरात दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पाच जणांना अटक

अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरूध्द भारतीय दंड विधान कलम ३६३, ३७६, ३८४ तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद आहे.

आरोपींपैकी एका आरोपीने आपल्या ओळखीच्या असलेल्या पीडित मुलीला बोलावून घेतले होते. तेथे अन्य चार आरोपींनी तिला बळजबरीने बिअर पाजवली. बिअर पाजतानाचे चित्रिकरणही करण्यात आले. नंतर याच चित्रिकरणाच्या आधारे धमकावत तिच्यावर पुनःपुन्हा लैंगिक अत्याचार करण्यात आले.

हा धक्कादाय प्रकार ऑक्टोबर २०१८ मध्ये पंढरपूरच्या आंबाबाई पटांगणात घडला होता. एका अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्या लैंगिक अत्याचार झाले होते. अत्याचार करताना नराधमांनी घटनेचे चित्रिकरणही केले होते. त्यानंतर पुन्हा हे चित्रिकरण सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत या नराधमांनी पीडित मुलीवर पुनःपुन्हा लैंगिक अत्याचार केले होते. एवढेच नव्हे तर पीडित मुलीच्या वडिलांकडे खंडणीही मागितली, असा आरोप आहे. त्याप्रमाणे पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सर्व पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2019 3:06 pm

Web Title: pandharpur 17 year old girl gang raped five arrested by pandharpur police nck 90
Next Stories
1 गणपतीपुळेः कोल्हापुरातील तीन जण समुद्रात बुडाले
2 समान नागरी कायद्याचा तो दिवसही दूर नाही – उद्धव ठाकरे
3 गिरणी कामगाराचा मुलगा बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाला – नारायण राणे
Just Now!
X