News Flash

राष्ट्रवादी भाजपाला देणार धक्का; काळे अजित पवारांच्या उपस्थितीत करणार प्रवेश

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक

भाजपा नेते कल्याणराव काळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. (संग्रहित छायाचित्र)

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगू लागला असून, मतदानापूर्वीच भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. भाजपाचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चत झाल्याचं वृत्त आहे. काळे ८ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने दिवंगत आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपाने समाधान आवताडे यांना रिंगणात उतरवलं आहे. मात्र, मतदान होण्यापूर्वीच भाजपाला धक्का बसणार आहे. भाजपाचे नेते कल्याणराव काळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.

कल्याणराव काळे हे ८ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं वृत्त आहे. पंढरपूर मतदारसंघात विजय मिळवण्यासाठी भाजपा आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच काळे यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश भाजपाला धक्का मानला जात आहे. २०१४ मध्ये कल्याणराव काळे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यांना ६५ हजार मतं मिळाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काळे यांनी भाजपात प्रवेश केला होता.

मागील काही दिवसांपासून सुरू होती चर्चा…

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा आधापासूनच कल्याणराव काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. कल्याणराव काळे यांनीही तसे संकेत दिले होते. एका कार्यक्रमात बोलताना ‘आपण यापुढे शरद पवार साहेब सांगतील त्या पद्धतीने काम करू,’ असं विधान केलं होतं. ‘पवार यांच्यामुळेच साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार,’ असं ते म्हणाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 4:03 pm

Web Title: pandharpur assembly bypoll bjp leader kalyanrao kale will join ncp bmh 90
Next Stories
1 जंगलात मोहफूल गोळा करत असतानाच तिथे वाघ दबा धरुन बसला होता; अन् त्यानंतर….
2 राज्यात करोनानं नवं आव्हान उभं केलं! ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती चिंताजनक!
3 “पवारसाहेब, दुसऱ्याचे हात बांधलेले नसतात, खुनाचं उत्तर खुनानं चांगलं दिसणार नाही”
Just Now!
X