कार्तिकी वारीसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भाविकांना विषबाधा झाली. वरीचे तांदुळ ( भगर ) खाल्ल्याने ३२ भाविकांना उलटी आणि जुलाब झाले. मात्र वेळेत वैद्यकीय उपचार मिळाल्याने काही भाविकांना सोडण्यात आले असुन उर्वरित भाविकांची तब्तेत सुधारली आहे

येथील धुंडा महाराज मठा शेजारील इनामदार वाढल्यात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील भाविक कार्तिकी वारीसाठी आले आहे. एकादशीच्या संध्याकाळी येथील भाविकांनसाठी उपवासाची भगरची खिचडी बनवली होती. ही खिचडी खाल्ल्याने पहाटे तीन वाजता जुलाब,उलट्याचा त्रास होऊ लागला. या भाविकांना तात्काळ पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. डॉ. धोत्रे यांनी उपचार केले. त्या मधील काही जणांची प्रकृती सुधारणा झाल्याने त्यांना रूग्णालयातुन सोडण्यात आले असुन उर्वरित भाविकांची तब्तेत सुधारणा होत आहे ‌.

दरम्यान,या बाबत भगर आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे भाविक सुखरुप आहेत.