News Flash

पंढरपूर : अतिवृष्टीमुळे चंद्रभागेच्या घाटावरील भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू

पावसाचा हाहाकार; अनेक घरं आणि शेतशिवारात पाणी साचले

सतत कोसळणाऱ्या पावसाच्या तडाक्यात पंढरपुरमधील चंद्रभागा नदीच्या तीरावरील कुंभार घाटा शेजारील भिंत कोसळली. यात सहा जणांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक सखल भागातील घरात पाणी साठालेले होते तर ग्रामीण भागात शेत शिवार मध्ये पाणी साठल्याने मोठं नुकसान झाले.

परतीच्या पावसाने पंढरपूरला चांगलेच झोडपून काढले आहे. मंगळवार रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. बुधवारी येथील चंद्रभागा नदीच्या तीरावरील असलेल्या कुंभार घाटा जवळ दुपारी अडीचच्या सुमारास दगडी बांधकाम असलेली भींत सततच्या पावसाने कोसळली. या भितींच्या आडोश्याला सहा लोक उभे होते. अचानक भिंत कोसळल्याने आडोश्याला उभे असलेले नागरिक ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यानंतर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने ढिगारा काढण्याचे काम सुरु केले. या घटनेची माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. ढिगारा काढण्यासाठी जेसीबी बोलवण्यात आला. ढिगाऱ्याखालील सहा जणांना बाहेर काढण्यात आलं. यपैकी पाच जणांचा जागेवरच तर एकचा उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये गोपाळ अभंगराव, राधाबाई गोपाळ अभंगराव, मंगेश गोपाळ अभंगराव , पिल्लू उमेश जगताप आणि दोन अनोळखी महिला वारकऱ्यांचा समावेश आहे. पंढरपुरातील या घटनेनंतर अनेक घाटावर असलेले अतिक्रमण आता तातडीने काढण्यासंदर्भातील चर्चा पुन्हा सुरु झाल्यात.

पंढरपूरमध्ये पावसामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. शहरातील अनेक सखल भागत पाणी साठले तर काही भागातील घरात पाणी शिरल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ग्रामीण भागात शेतशिवारात पाणी साठलेतर अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावासाने रोगराई पसरू नये म्हणून आवश्यक ती फवारणी तातडीने करावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 6:25 pm

Web Title: pandharpur six died due to wall collapse as heavy rain lashes the region scsg 91
Next Stories
1 मोठी बातमी! जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत खुली चौकशी होणार
2 एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांबाबत भुजबळ म्हणाले…….
3 दिल्लीत सहा वर्षांपासून कोणाचा बाप बसलाय; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर पलटवार
Just Now!
X