06 March 2021

News Flash

पांडुरंगाच्या दर्शनासाठी एसटीची ‘विठाई ’, उद्यापासून पंढरीचा प्रवास सुलभ

बसने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच

पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) कडून सोमवारपासून नवीन बससेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेचे ‘विठाई’ असे नामकरण करण्यात आले असून उद्यापासून बससेवेला सुरुवात होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पंढरपुरात 24 डिसेंबर रोजी म्हणजे उद्या या सेवेचं लोकार्पण केलं जाणार आहे.

पंढरपुर हे वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. आषाढी एकादशीनिमित्त दहा लाखांहून अधिक भाविक विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येत असतात. दररोज हजारो भाविकांची पावले पंढरीकडे वळतात. विठ्ठलभक्तांचा हा ओघ राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुरू असतो. अनेक भाविक परराज्यातूनही येतात. पंढरीत येण्यासाठी ठिकठिकाणाहून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक भाविक खासगी वाहनांने प्रवास करतात. पण अनेकदा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो. मुक्काम, जेवणाची गैरसोय होते. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने खास पंढरपुरात येणाऱ्या भाविकांसाठी ‘विठाई’ ही नवीन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाचे अध्यक्ष, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची ही संकल्पना आहे.

सुरुवातीला दहा बस वारकऱ्यांच्या सेवेत दाखल होतील. दापोडी (पुणे) येथे या बसची निर्मिती करण्यात येत आहे. एसटीच्या प्रत्येक विभागात ही विठाई बस लवकरच दाखल होणार आहे. 2×2 पुश बॅक सीट असल्याने राज्यातील वारकऱ्यांचा पंढरपूर तसंच पंढरपूर ते आपल्या गावापर्यंतचा प्रवास आरामदायी होणार आहे. सोबतच प्रासंगिक करार पध्दतीने सध्या जे भाडे आकारले जाते, त्या दरातही ही विठाई बस सेवा पुरविली जाणार आहे. त्यासाठी भाविकांना अगोदर गटागटाने नोंदणी करणं आवश्यक असेल. या बसने प्रवास करणाऱ्या भाविकांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्थाही एसटीकडूनच देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. एकाच पॅकेजमध्ये ‘प्रवास, राहणे व जेवण’ या तिन्ही गोष्टी समाविष्ट असल्याने भाविकांची गैरसोय टळणार आहे. अत्यंत माफक दरात ही सेवा मिळेल. त्यामुळे खासगी वाहनांकडून होणारी आर्थिक लुटही थांबेल.

पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने ‘विठाई’ ची रचना आकर्षक बनवली आहे. बसच्या बॉडीवर विठ्ठल आणि वारकरी यांचे चित्र आहे. पांढऱ्या आणि लाल रंगात ती उठून दिसते. आतमध्ये आरामदायी आसन व्यवस्था आहे. खिडक्‍या मोठ्या आणि हवेशीर आहेत. तसेच नियमित बसपेक्षा याची उंची वाढवली आहे. याशिवाय ऍल्युमिनियमऐवजी पोलादी पत्र्याचा वापर करण्यात आला आहे. तसंच आरामदायक आसने, दोन आपत्कालीन दरवाजे देण्यात आले असून एकूण 42 प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2018 12:59 pm

Web Title: pandharpur vithai st bus
Next Stories
1 भंडारा : आश्रमशाळेच्या क्रीडा स्पर्धेदरम्यान 174 विद्यार्थ्यांना विषबाधा
2 आदित्य ठाकरेंना एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचं खुलं पत्र
3 ‘मैत्रेय’कडून वीस हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक
Just Now!
X